अस्तित्वात नसलेल्या केळी महामंडळाला १०० कोटी; दोन मुख्यमंत्र्यांची दोन वेळा घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 07:36 AM2023-07-06T07:36:01+5:302023-07-06T07:36:07+5:30

तिसऱ्या वेळी थेट निधी

100 crore to the defunct Banana Corporation; Two Chief Ministers announced twice | अस्तित्वात नसलेल्या केळी महामंडळाला १०० कोटी; दोन मुख्यमंत्र्यांची दोन वेळा घोषणा

अस्तित्वात नसलेल्या केळी महामंडळाला १०० कोटी; दोन मुख्यमंत्र्यांची दोन वेळा घोषणा

googlenewsNext

- किरण चौधरी

रावेर  (जि. जळगाव) : केळी विकास महामंडळाची स्थापना करण्याची दोन मुख्यमंत्र्यांनी दोनदा घोषणा केली. तरीही महामंडळ अस्तित्वात आले नाही. तरीही जळगाव दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामंडळाला चक्क १०० कोटी देण्याची घोषणा केली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

युतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केळी विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजप-शिंदे सेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथील दौऱ्यात केळी विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा आदिशक्ती संत मुक्ताईच्या अंगणात केली होती.

आता तर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात केळी विकास महामंडळाला १०० कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत, तसे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे महामंडळ एकदाचे होऊ द्या...अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: 100 crore to the defunct Banana Corporation; Two Chief Ministers announced twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.