१०१ नवे रुग्ण ३१९ जण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:16 AM2021-04-02T04:16:54+5:302021-04-02T04:16:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव शहरात गुरूवारी १०१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून चार बाधितांचा मृत्यू झाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहरात गुरूवारी १०१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ३१९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, चोपडा तालुक्यात प्रथमच जळगाव शहरापेक्षा सक्रिय रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. चोपड्यात सातत्याने सर्वाधिक रुग्ण समोर येत असल्याने ही गंभीर स्थिती समोर आली आहे.
गुरूवारी एकत्रित ९२०४ चाचण्या झाल्या. आरटीपीसीआरचे तब्बल ३५८६ अहवाल समोर आले तर ॲन्टीजनच्या ५६१८ चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७३० तर ॲन्टीजनमध्ये ४३७ जण बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, मृतांमध्ये ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या चौघांचा समावेश आहे. कमी वयाच्या मृत्यूमध्ये सातत्याने वाढ हाेत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २७४३ असून चोपडा येथे २७७४ ॲक्टीव्ह केसेस आहेत.
डॉक्टरांना एकच दिवस रिलॅक्स
मनुष्यबळ कमी असल्याने शिवाय कोरोनात वर्षभराचा कालावधी लोटल्याने कोविडमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांच्या कामानंतरचा क्वारंटाईन कालावधी कमी करण्यात आला आहे. आता आठवड्यातून केवळ एकच दिवस रिलॅक्ससाठी मिळणार आहे. आधी आठवड्याच्या कामानंतर सात दिवस क्वारंटाईन अशी व्यवस्था होती. त्यानंतर हा कालावधी ३ दिवसांवर आणला आता बहुतांश डॉक्टरांच्या लसीचे दोन डोस झाले असल्याने हा कालावधी थेट एका दिवसावर आणण्यात आला आहे. जीएमसीत याची अंमलबजावणी केली जात आहे.