फैजपूरला कोरोना योद्ध्यांमुळेच १०२ रुग्ण कोरोनामुक्त : डॉ.अजित थोरबोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:35 IST2020-06-23T17:34:22+5:302020-06-23T17:35:14+5:30
कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत एकूण १०२ कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले आहेत.

फैजपूरला कोरोना योद्ध्यांमुळेच १०२ रुग्ण कोरोनामुक्त : डॉ.अजित थोरबोले
फैजपूर : येथील कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत एकूण १०२ कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले आहेत. या कोविड केअर सेंटरमधील कोरोना योद्ध्यांच्या कामांचे कौतुक करत खोट्या बाबींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.
डॉ.थोरबोले यांनी म्हटले आहे की, फैजपूर कोविड केअर सेंटरमधूून १०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सर्व शक्य झाले आहे ते तेथील डॉक्टर, नर्स, फार्मसिस्ट, सफाई कर्मचारी, शिपाई, रुग्णवाहिका चालक यांनी घेतलेली रुग्णांची अविरत काळजी. यामुळेच तसेच या ठिकाणी ज्या रूग्णांना आवश्यक आहे त्यांना रेफर केल्यामुळे ५० पेक्षा जास्त रुग्णांचे प्राण हे केवळ येथील डॉक्टरांनी समायसुचिकता दाखवल्यामुळे वाचले आहेत.
या सेंटरमध्ये आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांप्रमाणे औषधोपचार केला जातो. खोट्या बाबींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.