अमळनेरात १०५ फूट तिरंगा फडकणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 05:50 PM2021-01-25T17:50:17+5:302021-01-25T17:51:57+5:30

अमळनेर शहरात नगरपरिषदेतर्फे पन्नालाल चौकात १०५ फूट तिरंगा २४ तास फडकणार असून खांब उभारण्यात आला आहे.

105 feet tricolor to be flown in Amalnera! | अमळनेरात १०५ फूट तिरंगा फडकणार !

अमळनेरात १०५ फूट तिरंगा फडकणार !

googlenewsNext
ठळक मुद्देदिवस रात्र तिरंगा स्वाभिमानाने डौलाने फडकणार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शहरात नगरपरिषदेतर्फे पन्नालाल चौकात १०५ फूट तिरंगा २४ तास फडकणार असून खांब उभारण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात व वैशिष्ट्यात भर पडून तिरंगा आकर्षण ठरणार आहे.

शहरातील रस्ते व धुळे चोपडा राज्य मार्ग जोडणाऱ्या पन्नालाल चौकाचे सुशोभीकरण सुरू झाले असून शहराची आगळी वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि काही किमी अंतरावरून विशिष्ट ओळख दिसावी, म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड व नगरसेवकांच्या सहकार्याने या चौकात खांब उभारण्यात आला आहे.

यावर कायमस्वरूपी भारताचा तिरंगा फडकणार आहे. प्रकाशाचे दिवे लावण्यात येणार असल्याने दिवस रात्र तिरंगा स्वाभिमानाने डौलाने फडकणार आहे. प्रताप तत्वज्ञान केंद्र, संत सखाराम महाराज संस्थान, मंगळ मंदिर, अंबर्षी टेकडी, सती माता मंदिर आदींसह १०५ फूट तिरंगामुळे अमळनेरच्या वैशिष्ट्यात भर पडणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये देशभक्ती जागृत होईल.

खांब उभारण्यात आला असून शक्य झाल्यास २६ रोजी ध्वजारोहण होईल. अन्यथा आठ दिवसात संपूर्ण चौक सुशोभीकरण होऊन कायमस्वरूपी तिरंगा लावण्यात येणार आहे.

-साहेबराव पाटील, माजी आमदार, अमळनेर

Web Title: 105 feet tricolor to be flown in Amalnera!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.