दहावी निकाल : जळगावचा ७६.९२ टक्के, धुळे - ७७.११ तर नंदुरबारचा ७४.४४ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:33 PM2019-06-08T13:33:38+5:302019-06-08T13:34:10+5:30
नाशिक विभागाचा ७७.५८ टक्के निकाल
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ... टक्के लागला असून धुळे जिल्ह्याचा ७७.११ टक्के तर नंदुरबारचा निकाल ७४.४४ टक्के लागला आहे.
राज्याचा यंदाचा निकाल ७७.१० टक्के लागला आहे. १ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९ दरम्यान परीक्षा पार पडली. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
या परीक्षेला १७ लाख ८१३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश होता. विभागवार सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला होता.
मुलीं - 82.82, मुले 72.18
दिव्यांग 83.05
एकून उत्तीर्ण - 1247903
परीक्षा दिलेले- 1618602
100 टक्के गुण - 20 विद्यार्थी ( 16 लातूर, 1 अमरावती, औरंगाबाद 3 )
1794 - 100 टक्के निकाल शाळा
विभागानुसार निकाल खालीलप्रमाणे :
- पुणे :82.48
- नागपूर :67.27
- औरंगाबाद :75.20
- मुंबई :77.04
- कोल्हापुर :86.58
- अमरावती 71.98
- नाशिक :77.58
- लातूर :72.87
- कोकण :88.30
निकालाची वैशिष्ट्ये
एकूण 71 विषयांवर घेतल्या गेल्या परीक्षा
विद्यार्थ्यांना 1 वाजता आॅनलाइन बघता येणार निकाल
19 विषयांचा निकाल 100 टक्के
1 हजार पेक्षा अधिक शाळांचा निकाल 100 टक्के