व्यापाऱ्यांना ठगविणाऱ्यांकडून ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:16 AM2021-05-23T04:16:10+5:302021-05-23T04:16:10+5:30

फोटो : ९.०१ वाजेचा मेल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील व्यापाऱ्यांना माल घेण्याच्या बहाण्याने गंडविणाऱ्या तिघांना तालुका पोलिसांनी ...

11 lakh seized from fraudsters | व्यापाऱ्यांना ठगविणाऱ्यांकडून ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

व्यापाऱ्यांना ठगविणाऱ्यांकडून ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next

फोटो : ९.०१ वाजेचा मेल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील व्यापाऱ्यांना माल घेण्याच्या बहाण्याने गंडविणाऱ्या तिघांना तालुका पोलिसांनी अटक केली होती. पथकाने तिघांकडून इंदूर येथे जाऊन ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शहरातील प्रदिप मिरचंद माखीजा, राहुल हिरालाल वाधवानी व हरीशकुमार ऊर्फ राहूल शोभराजमल पेशवानी (दोन्ही रा. इंदूर) या तिघांनी गणपती नगरातील रहिवासी प्रशांत शांतीलाल पटेल यांचेकडून ७ लाख ६ हजार २०० रुपयांचे ५२२ बॉक्स टाईल्स माल त्याचप्रमाणे जगदिश दादूमल मंधान यांचेकडून १ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे कुकर व स्टीलची कढाई तसेच सिंधी कॉलनी येथील परेश जगदीश तलरेजा यांच्याकडून ८९ हजार ६८० रुपयांचे प्लायवूड माल व हेमल रजनिकांत मोदी यांचेकडून १ लाख ३९ हजार रूपये कुकर असा माल घेतला होता. नंतर हा माल इंदूर येथे घेवून गेले होते. मात्र, मालाच्या बिलाची रक्कम तिघांनी न दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे व्यापा-यांच्या लक्षात आले होते. नंतर त्यांनी तालुका पोलिसात त्यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. पोलिसांनीही व्यापा-यांना ठगणाऱ्यांना तिघांचा लागलीच शोध घेऊन अटक केली.

मुद्देमाल हस्तगत

जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली हरीलाल लक्ष्मण पाटील, विश्वनाथ गायकवाड, महेंद्र सोनवणे व अभिषेक पाटील यांचे पथक तयार करून संशयित आरोपीतांना इंदूर येथे घेवून जाऊन त्यांच्याकडून ५२२ बॉक्स टाईल्स, कुकर व कढई, प्लायवुड असा १० लाख ८० हजार ६० रूपयांचा माल जप्त केला आहे.

Web Title: 11 lakh seized from fraudsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.