जीएमसीमध्ये एकाच दिवसात ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:16 AM2021-03-28T04:16:28+5:302021-03-28T04:16:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाने जळगाव शहरात तीन दिवसात १५ मृत्यू झाले आहेत. यात शनिवारी एका २८ वर्षीय ...

11 people die in a single day in GMC | जीएमसीमध्ये एकाच दिवसात ११ जणांचा मृत्यू

जीएमसीमध्ये एकाच दिवसात ११ जणांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाने जळगाव शहरात तीन दिवसात १५ मृत्यू झाले आहेत. यात शनिवारी एका २८ वर्षीय तरूणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे एका दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ११ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, शहरात एकाच दिवसात ४०० नवे बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे ॲक्टीव्ह केसेसची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे.

शहरातील पिंप्राळा व खोटेनगर भागात सातत्याने अधिक रुग्ण आढळून येत आहे. गंभीर बाब म्हणजे जळगावातील वेगवेगळ्या भागातही रुग्णांची नोंद होत आहे. यात तरूणांचे प्रमाणही वाढल्याची माहिती असून अनेक तरूणांमध्ये आता गंभीर लक्षणे येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जळगाव शहरातील २८, ६८, ७२ वर्षीय महिला तर ६०, ६७ वर्षीय पुरूष यांच्यासह भुसावळ तालुक्यातील ४, चोपडा तालुक्यातील २, धरणगाव, एरंडोल, पाचाेरा येथील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ९०१ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.

तीन दिवसातील स्थिती

२५ मार्च : ३

२६ मार्च : ७

२७ मार्च : ५

जीएमसीतील मृत्यू वाढले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाण गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढले आहे. यात काही मृत्यू हे अगदीच लवकर होत असल्याने रुग्णांना रुग्णालयात आणण्यास उशीर होत असल्याचा निष्कर्षही डॉक्टरांनी काढला आहे. शनिवारी या रुग्णालयात तब्बल ११ मृत्यू झाल्याची नोंद आहे. या रुग्णालयात २६ मार्च रोजी या रुग्णालयात ८ तर २५ मार्च रोजी ५ मृत्यू झाल्याची नोंद आहे.

महिला रात्रभर खुर्चीवर

जळगाव शहरातील एका बाधित महिलेला ऑक्सिजन पुरवठ्याची गरज होती. या महिलेची ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्री दाखल करण्यात आले होते. आपात्कालीन कक्षात आधिच रुग्ण दाखल असल्याने अखेर या महिलेला रात्रभर खुर्चीवर ऑक्सिजन लावून बसविण्यात आले होते. शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सहा नंबरच्या कक्षात बेड रिकामा झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी हलविण्यात आले, आपात्कालीन विभागात एका बेडवर दोन दोन रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. बेडची परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे.

पॉझिटिव्हीटी

आरटीपीसीआर : ३० टक्के

ॲन्टीजन : ९.७० टक्के

Web Title: 11 people die in a single day in GMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.