सुधर्माचे ११ विद्यार्थी शालांत परीक्षा उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:16 AM2021-07-25T04:16:09+5:302021-07-25T04:16:09+5:30

राजीव गांधी नगर, समता नगर, खेडी, मन्यार खेडा येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात अभिषेक लोंढे, प्रिया हातागले, नीलेश ...

11 students of Sudharma pass exams in schools | सुधर्माचे ११ विद्यार्थी शालांत परीक्षा उत्तीर्ण

सुधर्माचे ११ विद्यार्थी शालांत परीक्षा उत्तीर्ण

Next

राजीव गांधी नगर, समता नगर, खेडी, मन्यार खेडा येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात अभिषेक लोंढे, प्रिया हातागले, नीलेश लोंढे, उमेश ढोले, निकिता राठोड, रंजना भालेराव, वैष्णवी पाटील, गायत्री महाजन, वैभव जोडपे, मुक्ता सालुंके, तनुजा मराठे हे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.

पदोन्नतीतील आरक्षणासाठी सोमवारी मोर्चा

जळगाव : ‘प्रतिनिधित्व बचाओ, लोकतंत्र बचाओ’ अंतर्गत ‘राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे सोमवार दि. २६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता स्वातंत्र्य चौकापासून या मोर्चाला सुरुवात होणार असल्याचे बहुजन कर्मचारी संघातर्फे कळविण्यात आले आहे.

चित्रपटगृह सुरू करण्याची मागणी

जळगाव : सार्वजिनक वाहतूक सुरू असून सार्वजनिक कार्यक्रमांनाही निश्चित संख्येत परवानगी देण्यात आली आहे. अशा स्थितीत चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सेंट्रल सर्किट सिने असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवदेन देण्यात आले आहे. या व्यवसायाशी संबंधित सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व चित्रपटगृह हे सर्व नियम पाळूनच उघडण्यात येतील, भारतात या व्यवसावर २० लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून हे सर्व लक्षात घेऊन चित्रपटगृह सुरू करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे खान्देश आणि विदर्भ सिनेमा व्यावसायिकांची संघटना सेंट्रल सर्किट सिने असोसिएशनने केली आहे.

Web Title: 11 students of Sudharma pass exams in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.