दक्षिण पूर्व रेल्वेच्या कामासाठी ११ गाड्या रद्द
By चुडामण.बोरसे | Published: September 28, 2023 05:30 PM2023-09-28T17:30:51+5:302023-09-28T17:31:03+5:30
दक्षिण- पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील राऊरकेला रेल्वे स्थानकात तिसऱ्या मार्गातील कामासाठी जवळपास ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
भुसावळ (जळगाव) : दक्षिण- पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील राऊरकेला रेल्वे स्थानकात तिसऱ्या मार्गातील कामासाठी जवळपास ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात यार्ड रिमॉडेलिंगसाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वेवरून सुटणाऱ्या/टर्मिनेट होणाऱ्या/ गाड्या रद्द करण्याचा/ पुन:निर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्र. १२८६९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -हावडा एक्सप्रेस - १ आणि १५ ऑक्टोबरला रद्द. गाडी क्र. १२८७० हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस २९ सप्टेंबर ,६ आणि १३ ऑक्टोबरला रद्द.
गाडी क्र. २२५११ लोकमान्य टिळक टर्मिनस - कामाख्या एक्सप्रेस ३ आणि १७ ऑक्टोबर रोजी तर
गाडी क्र. २२५१२ कामाख्या - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी रद्.
गाडी क्र. १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस - हटिया एक्सप्रेस १५ ऑक्टोबर तर गाडी क्र. १२८१२ हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १३ ऑक्टोबर रोजी रद्द. गाडी क्र. २२८४५ पुणे - हटिया एक्सप्रेस ८,१० ऑक्टोबर रोजी तर २२९४६ हटिया-पुणे एक्सप्रेस ९,१३ ऑक्टोबर रोजी रद्द. गाडी क्र. २०८२१ पुणे - संत्रागाची एक्सप्रेस २,१६ ऑक्टोबर तर गाडी क्र. २०८२२ संत्रागाची-पुणे एक्सप्रेस ३० सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी रद्.
गाडी क्र. २२८९३ साईनगर शिर्डी-हावडा एक्सप्रेस १४ ऑक्टोबर तर गाडी क्र. २२८९४ हावडा - साईनगर शिर्डी एक्सप्रेस १२ ऑक्टोबर रोजी रद्द. याशिवाय गाडी क्र. १२७६७ नांदेड- संत्रागाची एक्सप्रेस २ ऑक्टोबर तर गाडी क्र. १२७६८ संत्रागाची-नांदेड एक्सप्रेस ४ ऑक्टोबर रोजी रद्द. गाडी क्र. १३४२५ मालदा टाउन-सुरत एक्सप्रेस ७ ,१४ ऑक्टोबर तर गाडी क्र. १३४२६ सुरत- मालदा टाउन एक्सप्रेस २,१६ ऑक्टोबर रोजी रद्द. गाडी क्र. १७००७ सिकंदराबाद - दरभंगा एक्सप्रेस १४ ऑक्टोबर रोजी,तर गाडी क्र. १७००८ दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेस १७ ऑक्टोबर रोजी रद्द असेल. तसेच गाडी क्र.१२२६१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस --हावडा दुरांतो एक्स्प्रेस (प्रवास सुरू होण्याची तारीख) ८,१० व ११ ऑक्टोबरला रोजी ४ तासांनी पुन:निर्धारीत (री-शेड्यूल) केली जाईल.