जिल्ह्यात आठवडाभरात ११ बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 01:12 PM2020-05-17T13:12:57+5:302020-05-17T13:16:03+5:30
संख्या वाढल्याने चिंता
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यू थांबायला तयार नाही. रविवार ते शनिवार दरम्यान, ११ कोरोना बाधितांचा जीव गमवावा लागला आहे़ शनिवारी भुसावळ येथील एका प्रौढ रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे एकट्या भुसावळमध्ये मृतांची संख्या दहा तर जिल्ह्यात ३३ वर पोहचली आहे़
जिल्ह्याचा मृत्यूदराबाबत मोठा वादंग झाला होता़ प्रशासकीय यंत्रणेला समन्वय समितीच्या बैठकीत धारेवर धरण्यात आले होते़ मात्र, मृत्यू होणाऱ्यांमध्ये गंभीर रुग्ण व अन्य आजाराच्या रुग्णांना अधिक संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते़ मात्र, या गंभीर रुग्णांना वाचविण्यात यंत्रणेला यशच येत नसल्याचे चित्र या आठवड्यातही समोर आले आहे़ मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे़
भुसावळच्या रुग्णाला अन्य व्याधी नाही
भुसावळ येथील एका ५५ वर्षीय प्रौढाचा १४ मे रोजी मृत्यू झाला होता़ त्यांचा अहवाल शनिवारी सायंकाही प्राप्त झाला व हा रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले़ या रुग्णला गंभीरावस्थेतच गुरूवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले होत़
अॅट रिस्क लोकांचे सर्व्हेक्षण
कोरोनामुळे वृद्ध व अन्य व्याधी असलेल्या लोकांनाच मृत्यू अधिक धोका असल्याने हे मृत्यू थांबविण्यासाठी अशा लोकांना शोधून त्यांना सुरक्षित केल्यास मृत्यूचे प्रमाण रोखता येईल, असा उपाय ग्वेनेड हॉस्पिटल, नॉर्थ वेल्स येथे आयसीयूत समुपदेशक म्हणून कार्यरत डॉ़ संग्राम पाटील यांनी व्हिडिओद्वारे सुचविला आहे़ ग्रामपंचायत स्तरावर अशा लोकांना शोधले जावे, असेही त्यांनी सांगितले आह़े जिल्ह्यातील मृत्यूदर बघता हे उपाय गरजेचे ठरणार आहे़