माजी मुख्यमंत्र्यांसह 110 आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 05:39 PM2017-04-14T17:39:12+5:302017-04-14T17:39:56+5:30

शेतकरी संघर्ष यात्रा ही 15 रोजी सायंकाळी जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे पोहोचणार आहे. त्यात माजी मुख्यमंत्री सह 110 आमदारांचा सहभाग असणार आहे.

110 MLAs, including former Chief Ministers, will be participating in the struggle yatra | माजी मुख्यमंत्र्यांसह 110 आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार

माजी मुख्यमंत्र्यांसह 110 आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार

Next

 जळगाव,दि 14- शेतक:यांची कजर्माफी, शेतमालास हमीभाव व इतर मागण्यांसाठी दोन्ही काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली शेतकरी संघर्ष यात्रा ही येत्या 15 रोजी सायंकाळी जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे पोहोचणार आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, आरपीआयचे  जोगेंद्र कवाडे आदींसह 110 आमदारांचा सहभाग असणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी व युनायटेड जनता दल, आरपीआय (कवाडे गट) यांच्यातर्फे ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. 15 रोजी सायंकाळी 6 वाजता मुक्ताईनगरमधील महामार्गानजीकच्या नव्या मुक्ताई मंदिरात यात्रेत सहभागी मान्यवरांचे स्वागत जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेस व इतर सहकारी पक्षांचे सर्व जिल्हाध्यक्ष, आजी माजी मंत्री, आमदार व खासदार करतील.

Web Title: 110 MLAs, including former Chief Ministers, will be participating in the struggle yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.