जिल्ह्यात ११२८ हेक्टरला बसलाय गारपीटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:30 PM2018-03-01T12:30:10+5:302018-03-01T12:30:10+5:30
अस्मानी संकट
जळगाव: नुकत्याच झालेल्या गारपीटीमुळे जिल्ह्यातील ४ तालुक्यातील २४३१ शेतकºयांच्या ११२८ हेक्टर शेतीला फटका बसला आहे. त्यापैकी ९४४ शेतकºयांच्या ४१२.३० हेक्टरचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी तर १४८७ शेतकºयांचे ७१६.४६ हेक्टरचे ३३ टक्क्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरी अहवालात नमूद करण्यात आले आहे. शासनाला हा अहवाल रवाना झाला आहे.
११ व १३ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्ह्यात जळगाव, जामनेर, रावेर व मुक्ताईनगर या चार तालुक्यांना गारपीटीचा फटका बसला होता. त्यात प्राथमिक नुकसानीचा अहवाल तातडीने शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र नुकसान भरपाईसाठी अंतीम अहवाल पाठविणे बाकी होते. त्यानुसार ३३ टक्क्यांपेक्षा कमी व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक अशी विभागणीकरून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला होता. त्यानंतर अंतिम अहवाल सादर झाला आहे. त्यात जळगाव, रावेर व जामनेर या तीन तालुक्यात ९४४ शेतकºयांचे ४१२.३० हेक्टरवर ३३ टक्यांपेक्षा कमी नुकसान झाले. त्यात जळगाव तालुक्यात १०५ शेतकºयांचे १४५ हेक्टर, जामनेर तालुक्यात ८३२ शेतकºयांचे २६३.८० हेक्टर, रावेर तालुक्यात ७ शेतकºयांचे ३.५० हेक्टरचे नुकसान झाले आहे.
७१६ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान
रावेर, मुक्ताईनगर व जामनेर या तीन तालुक्यातील १४८७ शेतकºयांचे ७१६ .४६ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात रावेर तालुक्यात ३७ शेतकºयांचे ४२.७० हेक्टर, मुक्ताईनगर तालुक्यात ८ शेतकºयांचे ९.५० हेक्टर तर जामनेर तालुक्यात १४४२ शेतकºयांचे ६६४.२६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.