ग्रामपंचायत निवडणुकीत ११४३ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 08:51 PM2020-12-28T20:51:02+5:302020-12-28T20:51:15+5:30

एकूण १२१३ अर्ज : आता राहिले शेवटचे दोन दिवस

1143 applications filed in Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीत ११४३ अर्ज दाखल

ग्रामपंचायत निवडणुकीत ११४३ अर्ज दाखल

Next

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात सोमवारी एकूण एक हजार १४३ उमेदवारी अर्ज झाले आहे. जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एक हजार २१३ अर्ज दाखल असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे या दोन दिवसात गर्दी होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात दिवसेंदिवस निवडणुकीचा रंग चढत आहे. अनेक गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढतीची चिन्हे आहे. आमदारांनी त्या-त्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले असले तरी अद्याप कोणताही प्रतिसाद नागरिकांनी दिलेला नाही. अनेक गावांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात दोनऐवजी तीन पॅनलमध्ये निवडणुका लढविण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अनेक पॅनलचे अद्याप उमेदवार ठरले नसल्याचे बहुतांश ग्रामपंचायतींसाठी अद्यापही अर्ज दाखल झालेले नाही.

सर्वाधिक अर्ज जळगाव तालुक्यातून
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवार, २८ डिसेंबर रोजी एक हजार १४३ अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नव्हता. दुसऱ्या दिवशी २४ रोजी एकूण ७० अर्ज दाखल झाले होते. सोमवार, २८ रोजी दाखल एक हजार १४३ व पूर्वीचे ७० असे एकूण एक हजार २१३ अर्ज दाखल झाले आहे. सोमवारी सर्वाधिक १५८ अर्ज जळगाव तालुक्यात दाखल झाले. त्या खालोखाल जामनेर तालुक्यात १४९, रावेर व चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी १०४ अर्ज दाखल झाले. सर्वात कमी २३ अर्ज मुक्ताईनगर तालुक्यात दाखल झाले.

दोनच दिवस शिल्लक
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहे. सोमवारी झालेली गर्दी पाहता मंगळवारी व बुधवारी आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: 1143 applications filed in Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.