जळगाव जिल्ह्यातील ११५१ ग्रामपंचायती होणार ‘पेपर लेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:10 PM2018-02-28T12:10:19+5:302018-02-28T12:10:19+5:30

संगणकीकरण

1151 gram panchayats to be held in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील ११५१ ग्रामपंचायती होणार ‘पेपर लेस’

जळगाव जिल्ह्यातील ११५१ ग्रामपंचायती होणार ‘पेपर लेस’

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतीचे १ ते ३३ नमुने संगणकाद्वारे दैनंदिन कामकाज आॅनलाइन

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - ग्रामीण जनतेलाही जलदगतीने सुविधा देण्यासाठी आता गावपातळीवरील कारभार ‘पेपरलेस’ होणार असून महाराष्ट्र दिन अर्थात १ मेपासून ग्रामपंचायतचे कामकाज आॅनलाईन होणार आहे. यासाठी आपले सरकार योजनेतील ‘ई-ग्रामसॉफ्ट’ नावाने संगणकप्रणाली विकसित करण्यात आली असून जिल्ह्यातील ११५१ ग्रामपंचायमध्ये येत्या १ एप्रिलपासूनच केंद्रचालकांमार्फत ग्रामपंचायतीचे दप्तर संगणकीकृत केले जाणार आहे.
ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज आॅनलाइन करण्याकडे पाऊल उचलण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार, विविध नोंदी संगणकावरच होणार असून वेळेची बचत होणार आहे. आपले सरकारच्या सेवा केंद्रातील ई-ग्रामसॉफ्टद्वारे ग्रामपंचायतीचे १ ते ३३ नमुने संगणकाद्वारे मिळतील. या संबंधीची संपूर्ण माहिती ग्रामसेवकाला भरावी लागणार आहे. त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक, वार्षिक जमा-खर्च, वार्षिक करमागणी व वसुली यादी, कामाचे देयक, मोजमाप वही, ग्रामपंचायत लेखापरीक्षण पूर्तता वही, स्थावर मालमत्ता माहिती, रस्त्यांची माहिती, जमिनीचे नोंदणी पुस्तक, कर्मचारी पगारपत्रक, कामाचे देयक, कामाचे अंदाजपत्रक नोंदवही, वार्षिक करपावतीची कामे 'आॅनलाइन होणार आहेत.

Web Title: 1151 gram panchayats to be held in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.