जळगाव मनपा इमारतीवर नजर ठेवणार 116 सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Published: June 14, 2017 05:12 PM2017-06-14T17:12:24+5:302017-06-14T17:12:24+5:30

44 लाख रुपये खचरून तब्बल 116 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव

116 CCTV cameras to monitor Jalgaon building | जळगाव मनपा इमारतीवर नजर ठेवणार 116 सीसीटीव्ही कॅमेरे

जळगाव मनपा इमारतीवर नजर ठेवणार 116 सीसीटीव्ही कॅमेरे

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14 - मनपाच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीवर नजर ठेवण्यासाठी 44 लाख रुपये खचरून तब्बल 116 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने दिला आहे. येत्या महासभेत त्यावर निर्णय होणार आहे.
मनपाच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेश कक्ष तसेच बाहेर पार्किगच्या बाजूने कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र ही यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून खराब झाली आहे. त्यातच प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने देखरेख ठेवण्यात अडचण येत होती. त्यामुळे प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे विचाराधीन होते. त्यानुसार प्रत्येक मजल्यावर सुमारे 6 सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सभागृहात व पर्ा्िकगचा परिसर मिळून एकूण 116 कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी 44 लाख 24 हजार 914 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यात दोन डिस्पेलचाही समावेश आहे. या खर्चास मंजुरी देण्यासह यावर्षीच्या अर्थसंकल्पात सुधारणा करून या खर्चाची तरतूद करण्याची शिफारसही प्रशासनाने केली आहे.
 

Web Title: 116 CCTV cameras to monitor Jalgaon building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.