जळगाव जिल्ह्यात ११६७ नवे बाधित, १७ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:15 AM2021-04-12T04:15:05+5:302021-04-12T04:15:05+5:30
जळगाव : कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये गेल्या तीन दिवसांपासून अचानक मोठी वाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसात ५२ कोरोना ...
जळगाव : कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये गेल्या तीन दिवसांपासून अचानक मोठी वाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसात ५२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून दुसरीकडे गंभीर रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. यात ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांची संंख्या ही १६८० वर पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी पुन्हा ११६७ नवीन कोरोना बाधित आढळून आले असून धरणगाव तालुक्यातील २२ वर्षीय तरुणीसह १७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. १११६ रुग्ण बरेही झाले आहेत.
चोपडा शहरात गेल्या दोन दिवसांपासून कमी रुग्ण आढळून आल्याचे सकारात्मक चित्र आहे. शिवाय चारपटीने अधिक रुग्ण बरेदेखील झाले आहेत. जळगाव शहरात २३३ तर चोपडा तालुक्यात ६९ नवे रुग्ण समोर आले आहेत. जामनेर व एरंडोलमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या ठिकाणी अनुक्रमे ११८ व १३२ रुग्णांची नोंद झाली आहे.