जिल्ह्यात ११९१ नवे रुग्ण, १४ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:17 AM2021-03-31T04:17:06+5:302021-03-31T04:17:06+5:30
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी ११९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात ...
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी ११९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात ३७ वर्षांच्या तरुणाचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात जळगाव शहरातील १७१ नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर मंगळवारी ९२९ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाही. मंगळवारीदेखील जिल्ह्यात ११९१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात जळगाव शहर, भुसावळ १९३, अमळनेर १२०, चोपडा २३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
चोपड्यात संसर्ग नियंत्रणाबाहेर
चोपडा शहर आणि तालुक्यात मंगळवारी आरटीपीसीआर चाचणीत ५०, तर अँटिजन चाचणीत १८३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे चोपडा तालुक्यात आढळून आले आहेत. त्या पाठोपाठ भुसावळ तालुक्यात देखील तब्बल १९३ रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर आणि ग्रामीणमध्ये मिळून २१८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
जळगावचा पॉझिटिव्ही रेट राज्यापेक्षा कमी
जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यापेक्षा कमी आहे. त्यात जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट १२.३९ टक्के आहे. तर संपूर्ण महाराष्ट्राचा मिळून हाच दर १४.६९ टक्के आहे. एकूण केलेल्या चाचण्या आणि त्यातून पॉझिटिव्ह आलेले रुग्ण यातून हा दर काढला जातो.
(सर्व आकडेवारी २७ मार्चपर्यंत )
जळगाव आणि संपूर्ण महाराष्ट्र तुलना
(पहिला आकडा हा जळगावचा आणि दुसरा संपूर्ण महाराष्ट्राचा)
डबलिंग रेट - ५४.१६ - ५३.७६
ॲक्टिव्ह रेट ८.३६ - १२.०१
बरे होण्याचा दर ८९.७ - ८५.९५
मृत्यूदर १.९१ - २
लाखातून किती रुग्ण १३,९१९ - २१,३२१
पॉझिटिव्हिटी रेट १२.३९ - १४.६९
आठवड्यात रुग्ण वृद्धीचा दर ९.३७ - ९.४४
जळगाव शहरावर कोरोनाचा कहर
मृत्यू
जळगाव ग्रामीण - १२२४
जळगाव शहर ३५९
रुग्ण -
जळगाव ग्रामीण- ६०, ९०२
जळगाव शहर - २१ ८१८
जिल्ह्यातील साडेचार लाख जनता राहतेय कंटेन्मेंट झोनमध्ये
जळगाव जिल्ह्यात २७ मार्च पर्यंत १३३७ कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले होते. त्यातील ४ लाख ५४ हजार २१० लोक या कंटेन्मेंट झोनमध्ये राहत आहेत.
८१ टक्के रुग्णांना लक्षणेच नाहीत
जळगाव जिल्ह्यातील ८१.६ टक्के रुग्णांना लक्षणेच नाहीत. तर १२.६ टक्के रुग्णांना किरकोळ लक्षणे आहेत. तर ५.७ टक्के रुग्णांची प्रकृती ही गंभीर होत आहे.