१२ विधानसभा मंतदारसंघात ४ हजार ४०८ मतदान यंत्र रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:26 PM2019-04-13T12:26:05+5:302019-04-13T12:27:14+5:30

जळगाव शहरसाठी सर्वाधिक ४८८ मतदान यंत्र तर सर्वात कमी एरंडोल व मलकापूरला

12 assembly constituencies, 4 thousand 408 polling booths | १२ विधानसभा मंतदारसंघात ४ हजार ४०८ मतदान यंत्र रवाना

१२ विधानसभा मंतदारसंघात ४ हजार ४०८ मतदान यंत्र रवाना

googlenewsNext

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध कामे पूर्णत्वास लावली जात असून यामध्ये मतदानासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असलेले मतदान यंत्र जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील सर्व १२ विधानसभा मतदार क्षेत्रात रवाना झाले आहे. यामध्ये जळगाव मतदारसंघासाठी २ हजार ४६२ तर रावेर मतदार संघासाठी १ हजार ९४६ अशा एकूण ४ हजार ४०८ मतदान यंत्रांसह यंदा प्रथम वापरल्या जाणारे व्हीव्हीपॅटदेखील पोहचविण्यात आले आहे. यात जळगाव मतदार संघासाठी २ हजार ६८९ तर रावेर मतदार संघासाठी २ हजार ६३ अशा एकूण ४ हजार ७५२ व्हीव्हीपॅटचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा दिवस जस-जसा जवळ येत आहे, तसतसे एक-एक काम मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू आहे. यात मतदानासाठी आवश्यक मतदान यंत्रे पोहचविण्याचे काम ५ ते ९ एप्रिल दरम्यान पूर्ण करण्यात आले. भुसावळ येथे गोदामात यापूर्वीच सर्व यंत्रांची तपासणी झाल्यानंतर हे यंत्र मतदानासाठी तयार ठेवण्यात आले होते. या ठिकाणाहून पाच दिवसात ते १२ विधानसभा मतदार संघात पोहचविण्यात आले.

जळगाव शहरसाठी सर्वाधिक मतदान यंत्र
जळगाव व रावेर मतदारसंघात सर्वाधिक ४८८ बॅलेट युनिट व तेवढेच कंट्रोल युनिट जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी पाठविण्यात आले असून ५९२ व्हीव्हीपॅटदेखील रवाना करण्यात आले आहे. त्या खालोखाल चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासाठी ४११, जळगाव ग्रामीणसाठी ४०९ बॅलेट व कंट्रोल युनिट पाठविण्यात आले आहे. सर्वात कमी एरंडोल व मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ३६० बॅलेट व कंट्रोल युनिट पाठविण्यात आले आहे.
राखीव मतदान यंत्रही रवाना
प्रत्येक मतदान केंद्रासाठी आवश्यकसह राखीव बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट प्रत्येक विधानसभा मतदार संघात रवाना करण्यात आले आहे. कोणत्याही मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाला तर राखीव तयार ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.

 
 

Web Title: 12 assembly constituencies, 4 thousand 408 polling booths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव