फैजपूरच्या दूध सोसायटीकडून उत्पादकांना १२ टक्के बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:20 AM2021-08-27T04:20:03+5:302021-08-27T04:20:03+5:30
फैजपूर : येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेने दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधावर प्रतिलीटर तीन रुपये व गाईच्या दुधावर प्रतिलीटर ...
फैजपूर : येथील अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेने दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधावर प्रतिलीटर तीन रुपये व गाईच्या दुधावर प्रतिलीटर अडीच रुपये भावफरक तसेच या सर्व दुधाला प्रतिलीटरवर पन्नास पैसे बोनस, १२ टक्के डिव्हिडंड देण्याचे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले.
या संस्थेच्या ४४ व्या सर्वसाधारण सभेचे आयोजन २५ ऑगस्ट रोजी संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे चेअरमन हेमराज चौधरी यांच्या हस्ते सभासदांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन हेमराज चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक भास्करराव चौधरी यांनी केले. या वेळी व्यासपीठावर व्हा. चेअरमन नितीन राणे, चंद्रशेखर चौधरी, कमलाकर भंगाळे, डिंगबर कोल्हे, मोहन वायकोळे, रमेश झोपे, जितेंद्र भारंबे, अजय महाजन, लक्ष्मण झांबरे, उमाकांत भारंबे, विनोद चौधरी, विजय पाटील, वंदना कमलाकर कोल्हे, ज्योत्स्ना मोतीराम भारंबे, सेक्रेटरी सुनील क्षत्रिय, दूध शीतकेंद्र प्रमुख सागर भंगाळे, अमोल धांडे व दूध उत्पादक उपस्थित होते.
------------------------–-----------------------------------
संस्था प्रगतिपथावर असल्यामागे संचालक मंडळ, कर्मचारी व दूध उत्पादक या सर्वांचाच सिंहाचा वाटा आहे. दूध ग्राहकांनी टाकलेल्या विश्वासावर हा संस्थेच्या प्रगतीचा पाया भक्कम आहे.
- हेमराज चौधरी, चेअरमन - अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी, फैजपूर
फोटो कॅप्शन
दूध उत्पादक सभासदांना भेटवस्तू देऊन सत्कार करताना हेमराज चौधरी.