जळगाव जिल्ह्यात पीकविम्याच्या १२ कोटींच्या रक्कमेचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:15 PM2018-07-11T12:15:26+5:302018-07-11T12:20:04+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दोन दिवसांची मुदत

12 crore crop insurance | जळगाव जिल्ह्यात पीकविम्याच्या १२ कोटींच्या रक्कमेचा घोळ

जळगाव जिल्ह्यात पीकविम्याच्या १२ कोटींच्या रक्कमेचा घोळ

Next
ठळक मुद्दे किती क्लेम प्रोसेस केले माहिती मिळेनाबँकेने पैसे व माहिती मुदतीत भरल्याचा दावा

जळगाव : जिल्ह्यातील शेतकºयांकडून मागील वर्षीच्या खरीप हंगामात पीकविम्याच्या हप्त्यापोटी शेतकºयांच्या पीककर्जातून कपात केलेल्या रक्कमेपैकी १२ कोटी रूपयांच्या रक्कमेबाबत घोळ आहे. जिल्हा बँकेकडून ओरिएंटल इन्शुरन्स या विमा कंपनीला ही रक्कम भरण्यासोबत माहितीही वेळेवर भरली असल्याचा दावा केला जात असून कंपनीकडून मात्र या रक्कमेतून किती शेतकºयांचे क्लेम प्रोसेस केले? याची माहिती मिळत नसल्याचे हा घोळ निर्माण झाला आहे.
सोमवार, ९ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या पीक विमा आढावा बैठकीत हा विषय समोर आल्याने जिल्हाधिकाºयांनी जिल्हा बँक व विमा कंपनीला याबाबत शहानिशा करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यात २०१७ मध्ये खरीप हंगामात एकूण ८५ हजार ५७८ शेतकºयांचा ११ कोटी ३९ लाख ७७ हजार ५९२ हेक्टर क्षेत्राचा ४५३ कोटी ४८ लाख ९३ हजार ५६६ रूपयांचा विमा उतरविण्यात आला होता. त्यासाठी शेतकºयांनी १६ कोटी ३३ लाख २९ हजार ६२३ रूपयांचा विमा हफ्ता भरला होता. तर रब्बी हंगामात ४ लाख ४१ हजार ८०२ रूपयांचा हफ्ता भरला होता. मात्र विमा कंपनीकडून आलेल्या याद्यांमध्ये अनेक गावांमधील शेतकºयांची नावेच वगळली असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. तर अनेक शेतकºयांना नुकसान होऊनही विम्याचा लाभ पुरेसा मिळाला नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत जिल्हा बँक उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे तसेच विमा कंपनीविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशाराही दिला होता. अशाच काही तक्रारींबाबत सोमवार, ९ जुलै रोजी झालेल्या पीक विमा आढावा बैठकीत चर्चा झाली. त्यात १२ कोटींच्या रक्कमेबाबत घोळ असल्याचे आढळून आले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने पीकविम्याच्या हप्त्यापोटी (प्रिमियम) शेतकºयांकडून १२ कोटी रूपये गोळा केले. ते भरणा केले. मात्र ओरिएंटल कंपनीच्या म्हणण्यानुसार जिल्हा बँकेने त्याबाबत आॅनलाईन माहितीचा भरणा ३१ जुलै २०१७ पर्यंत करणे आवश्यक असताना तो केलेला नाही. तर माहितीचा भरणा वेळेवर केला असल्याचे जिल्हा बँकेचे म्हणणे आहे. बँकेच्या माहितीवर विमा कंपनीने प्रोसेस केली की नाही? किती खातेदारांच्या माहितीवर प्रोसेस केली व किती खातेदारांच्या माहितीवर केली नाही? याची शहानिशा होत नसल्याने दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. प्रोसेस केलेली नसेल तर फौजदारी कारवाई केली जाईल.
बँकेने पैसे व माहिती मुदतीत भरल्याचा दावा
जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने २०१७ च्या हंगामात ७२ हजार शेतकºयांचे विमा हप्त्याचे १२ कोटी रूपये विमा कंपनीला (ओरिएंटल इन्शुरन्स) मुदतीत पाठविले आहेत. माहितीही मुदतीत पाठविली आहे. त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. विमा कंपनीकडूनच घोळ झाला आहे. कंपनीने पाठविलेल्या पहिल्या यादीत शेतकºयांची नावे होती ती दुसºया यादी नाहीत. त्याचे उत्तर कंपनी देऊ शकत नाही. पैसे भरलेले असल्याने विमा देणे (नुकसान भरपाई) कंपनीची जबाबदारी आहे.
विमा कंपनीकडून २० कोटीची भरपाई
२०१७च्या खरीप हंगामातील जिल्हा बँकेच्या सभासद १७ हजार ४१० शेतकºयांना विमा कंपनीकडून फक्त १९ कोटी ९० लाख ५९ हजाराची भरपाई मिळाली आहे. त्यापैकी १६ हजार १२० सभासदांच्या नावावर १९ कोटी ८ लाख ३३ हजरांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

Web Title: 12 crore crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.