उन्हाच्या झळांवर दररोज १२० लिटर 'ताका'ची फुंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 06:44 PM2018-04-19T18:44:38+5:302018-04-19T18:44:38+5:30
चाळीसगाव येथील जैन अर्लट ग्रुपचा सेवाभावी उपक्रम
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव दि.१८ : जिल्हाभरात तापमानाने ४२ पर्यंत मजल मारल्याने आबालवृद्ध उष्णतेच्या झळांनी हैराण झाले आहेत. उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी चाळीसगाव येथील जैन अर्लट ग्रुपतर्फे दररोज १२० लीटर ताकाचे मोफत वाटप नागरिकांना करण्यात येत आहे.
हेमरत्न सुरीश्वर म.सा.यांच्या संयम सुवर्ण महोत्सवी पर्वानिमित्त स्टेशन रोड परिसरातील पद्यप्रभू स्वामी जैन मंदिराजवळ हे ताक वाटप केंद्र सुरु करण्यात आले आहे. दुपारी ११ ते ३ यावेळात जैन अर्लट गृपचे पदाधिकारी स्वखर्चाने हा उपक्रम राबवित आहे. शनिवारी बाजाराच्या दिवशी २४० लिटर तर इतर सोमवार ते शुक्रवार १२० लिटर वाटप होते. बाजाराच्या दिवशी ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा फायदा होत असून चविष्ट थंडगार मठ्ठा पिऊन ते समाधान व्यक्त करतात.
यशस्वीतेसाठी कुशल सोलंकी, हितेश सोलंकी, संदेश टाटिया, संदीप देसर्डा, श्रेयान संकलेचा, विकास मुथा, दर्शन मेहता, विपुल संघवी, मयुर सोलंकी, राजेश बागरेचा, राजेश शेठ, वृषभ सोलंकी, दीपक बागरेचा हे परिश्रम घेत आहे. जैन गृपच्या या आगळ्या - वेगळ्या समाजसेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.