नशिराबादला १२२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:30+5:302021-03-23T04:17:30+5:30
नशिराबादला122 जणांची वीज पुरवठा खंडित नशिराबाद: येथे सुमारे वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांकडे दीड कोटीच्या घरात थकबाकी असल्यामुळे थकबाकी वसुलीसाठी ...
नशिराबादला122 जणांची
वीज पुरवठा खंडित
नशिराबाद: येथे सुमारे वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांकडे दीड कोटीच्या घरात थकबाकी असल्यामुळे थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने धडक वसुली मोहीम गावात राबवत आहे. थकबाकी न भरणाऱ्याविरुद्ध वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तब्बल १२२ जणांचा वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता पवन वाघुळदे यांनी ‘लोकमत’ला दिली. थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वसुली मोहीम राबवली जात आहे. दरम्यान वसूल थकबाकी मोहिमेत ग्राहकांना थकबाकी भरण्यात सवलत देण्यात यावी अशी मागणी ग्राहक राजा व्यक्त करीत आहे. दरम्यान, नशिराबाद ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा व पथदिव्यांची लाखो रुपयांची थकबाकी थकीत असल्यामुळे तोही वीज पुरवठा खंडित करण्याची तयारी वीज वितरण कंपनीने दर्शवली आहे. त्यातच आधीच गावातील आरओ प्रणाली केंद्र व शेळगाव पाणी पुरवठ्याची वीज कापण्यात आली आहे त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.