अतिदक्षता विभागात १३ रुग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:13 AM2021-01-04T04:13:44+5:302021-01-04T04:13:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कोरोनाच्या अतिदक्षता विभागात १३ रुग्ण दाखल असून, या ठिकाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कोरोनाच्या अतिदक्षता विभागात १३ रुग्ण दाखल असून, या ठिकाणी केवळ तीन बेड शिल्लक आहेत. यातील दोघे हे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. दरम्यान, गंभीर रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सी २, सी ३ आणि जुना अतिदक्षता विभाग हे कक्ष कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. सी १ कक्ष स्ट्रेन कोरोनासाठी राखीव असल्याने या ठिकाणी एकही रुग्ण दाखल नाही. तर सी २ हा कक्ष केवळ संशयित रुग्णांसाठी आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी मर्यादित व्यवस्था असून आता गंभीर रुग्ण वाढल्यास रुग्णांची अन्यत्र व्यवस्था करावी लागणार आहे. .
स्ट्रेन कोरोना आता वाढणार नाही?
जळगावात विदेशातून २८ नागरिक आलेले आहेत. यात ब्रिटनहून आलेल्यांची संख्या अधिक असून त्यांच्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. मात्र, अद्याप एकही संशयित रुग्ण कोरोना कक्षात दाखल झालेला नाही. स्ट्रेन कोरोनाचा संसर्ग हा आता होण्याची शक्यता कमीच असल्याचे काही तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. हा कोरोना वेगाने पसरणारा असून त्यामुळे आतापर्यंत त्याच्या केसेस नसल्याने दिलासा आहेच. महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही, मात्र संशयित रुग्ण समोरही आला तरी त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था जीएमसीत करण्यात आली आहे. सी १ कक्षात व्हेंटिलेटर्स बसू शकतात. अशा किमान १७ बेडची व्यवस्था आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात स्ट्रेनचे काही वातावरण नसल्यास नियमित कोरोना रुग्णांसाठी हा कक्षही उघडण्यात येईल, असे चित्र आहे.