म्युकर मायकोसीसचे जिल्ह्यात १३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:39+5:302021-05-13T04:16:39+5:30
जळगाव : जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे सध्या म्युकरमायकोसिसचे १३ रुग्ण असल्याची नोंद आहे. त्यातील ९ रुग्ण हे आधीच मधुमेहाने त्रस्त ...
जळगाव : जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे सध्या म्युकरमायकोसिसचे १३ रुग्ण असल्याची नोंद आहे. त्यातील ९ रुग्ण हे आधीच मधुमेहाने त्रस्त होते. या १३ पैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना म्युकर मायकोसीसचा धोका जाणवत आहे. राज्यातही गेल्या काही दिवसांपासून म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यातदेखील या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळत होते. यात १३ रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. त्यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
काय आहे म्युकर मायकोसीस
म्युकर मायकोसीस हा बुरशीजन्य दुर्मिळ संसर्ग आहे. सध्या मात्र कोरोनामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर त्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यात डोळ्याच्या एका बाजुला किंवा तोंडाच्या एका बाजुला सुज येते डोकेदुखी, सायनस रक्तसंचय अशी याची लक्षणे आहेत. कोरोनाच्या आधीच्या काळात हा संसर्ग फारशा प्रमाणात पसरत नव्हता. मात्र आता त्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळु लागले आहेत. म्युकरमायकोसीस हा मेंदु, नाक, सायनसमध्ये वाढतो. हा गंभीर स्वरुपात पसरतो आणि त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. आधी मधुमेहामुळे म्युकर मायकोसीस होण्याचे प्रमाण जास्त होते. मात्र आता कोरोनामुळे म्युकरमायकोसीसचे प्रमाण देखील वाढले आहे.