जळगावात सट्टा पेढीवर धाड;13 जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:01 PM2017-07-30T13:01:17+5:302017-07-30T13:02:23+5:30

परिविक्षाधीन उपअधीक्षकांची पुन्हा धाड : 72 हजारांचा माल जप्त

13 people detained in Jalgaon Satta club | जळगावात सट्टा पेढीवर धाड;13 जण अटकेत

जळगावात सट्टा पेढीवर धाड;13 जण अटकेत

Next
ठळक मुद्दे नेरी नाका स्मशानभूमीजवळील सट्टा पेढीवर कारवाई 13 जणांना अटक करण्यात आली48 हजार 630 रुपये रोख, 12 हजार रुपये किमतीचे 7 मोबाईल व 12 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 72 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

ऑनलाईन लोकमत


जळगाव, दि. 30 - नेरी नाका स्मशानभूमीजवळील सट्टा पेढीवर कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता कालिंका माता मंदिर परिसरातील जुना खेडी रस्त्यावर सट्टा पेढीवर धाड टाकली. त्यात 13 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 48 हजार 630 रुपये रोख, 12 हजार रुपये किमतीचे 7 मोबाईल व 12 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 72 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला  आहे.
धनंजय पाटील यांनी गुरुवारीही नेरी नाका परिसरातील ङिापरु अण्णा नगरात सट्टा पेढीवर धाड टाकून                26 जणांना अटक केली                          होती. त्यावेळी 1 लाख 15 हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली होती. त्या पेढीचा मालक खंडू राणे हाच आजच्या कारवाईतील पेढी मालक आहे.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, शीघ्र कृती दलाचे जवान प्रकाश कोकाटे, दीपक सोनार, राहुल धेंडे, धनंजय येवले, नंदकिशोर ढामणे, तेजस मराठे, अनिल कांबळे, अभिमान पाटील, रिजवान शेख व अनिल बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 सिध्दार्थ श्यामराव अहिरे, भगवान माणिक पाटील, राजेंद्र दशरथ पाटील, कैलास शंकर माळी, आनंदा भिका सोनवणे,(सर्व,रा.खेडी बु.ता.जळगाव), उध्दव राम सुर्वसे, अशोक भिमा सपकाळे , योगेश चावदस सपकाळे(रा.सुनसगाव, ता.भुसावळ), सदाशिव रामसिंग महाजन (रा.खंडाळा, ता.भुसावळ), अमोल नारायण खडके (रा.शंकर अप्पा नगर, जळगाव), माधव मारोती धुमाळ (रा.चिंचोली, ता.जळगाव), अजरुन धनसिंग पाटील (रा.मेस्को माता नगर, जळगाव) व भादू देवराम पाटील (रा.देवगाव,ता.चोपडा) यांना अटक करण्यात आली. समावेश आहे. पेढी मालक खंडू वामन राणे हा फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: 13 people detained in Jalgaon Satta club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.