जळगाव जिल्ह्यातील १३ शाळा अनधिकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:50 PM2018-05-23T12:50:34+5:302018-05-23T12:50:34+5:30
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २३ - प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनाची परवानगी न घेता सर्रास कारभार चालविणाऱ्या शाळांची तपासणी मोहिम राबविण्यात आली होती़ या तपासणीत जिल्ह्यातील १३ शाळा ह्या अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ पालकांनी विद्यार्थ्यांचा या शाळेत प्रवेश घेऊ नये असे फलक या शाळांबाहेर लावण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे यांनी दिली़ दरम्यान, सर्वाधिक अनधिकृत शाळा ह्या चोपड्या तालुक्यात आढळुन आल्या आहेत़
दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी जाहिर करण्यात येत असते़ त्याअनुषघाने यंदा सुध्दा स्वंय-अर्थ सहाय्यीत शाळांची तपासणी करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते़ त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील १ ली ते ८ वी पर्यंतच्या स्वय अर्थसहाय्यीत शाळांची तपासणी मोहिम काही दिवसांपासून राबविण्यात येत होती़ अखेर ही मोहिम पूर्ण झाली आहे़ या मोहिमे दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाला धक्कादायक बाब समोर आली असून जिल्ह्यातील १३ शाळा या शासनाची परवानगी न घेता सर्रास कारभार चालवित असल्याचे आढळुन आले आहे़
अशा आहेत अनधिकृत शाळा चोपडा- अंबाडे खाज्यामुंडा निवासी आदिवसी आश्रमशाळा, मराठे खाज्या नाईक आश्रमशाळा, मराठे ओम गुरूदत्त उच्च प्राथमिक शाळा, मोहिदा गुरूकुल इंग्लिश मीडीयम स्कुल, चोपडा अलवीया इंग्लिश मीडीयम स्कूल,़ चाळीसगाव- मेहुणबारे सरस्वती इंग्लिश मीडीयम स्कूल,़ भडगाव- भडगाव स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, भडगाव सरस्वती इंग्लिश स्कूल,़ एरंडोल- कासोदा आर्यन इंटरनॅशनल स्कूल, कासोदा होली इंग्लिश मीडीयम स्कूल,़ मुक्ताईनगर- मुक्ताईनगर डॉ़ एपीजे़ अब्दूल कलाम इंग्लिश स्कूल,़ पाचोरा- नगरदेवळा बालाजी इंग्लिश मीडीयम स्कूल,़ धरणगाव- पाळधी आर्यन इंटरनॅशनल स्कूल अशा या १३ शाळा अनधिगृत ठरविण्यात आल्या आहेत़
नोटीस बजावल्या
जिल्ह्यातील तेराही शाळांना प्राथमिक शिक्षण विभागातर्फे नोटीस बजावण्यात आल्या आहेत़ तसेच शाळांवर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे यांनी दिली़
फलक लावणार
अनधिकृत शाळांच्या बाहेर गटशिक्षणाधिकाºयांना सांगून पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे आशयाचे फलक लावण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत़ तर शाळांवर त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे़