भुसावळच्या स्वच्छतेसाठी चार तासात 13 ट्रॅक्टर कच:याची विल्हेवाट
By admin | Published: May 15, 2017 11:37 AM2017-05-15T11:37:05+5:302017-05-15T11:37:05+5:30
शहरातील चित्र पालटण्यासाठी सामाजिक संस्थांनीदेखील स्वच्छतेसाठी पुढाकार घेत त्या स्वच्छतेसाठी सरसावल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 15 - अस्वच्छतेमध्ये भुसावळ शहर देशभरात दुस:यास्थानी असल्याचे समोर आल्यानंतर शहरातील चित्र पालटण्यासाठी सामाजिक संस्थांनीदेखील स्वच्छतेसाठी पुढाकार घेत त्या स्वच्छतेसाठी सरसावल्या आहेत. सोमवारी सकाळीच शहरातील श्री नगर, मथुरा अपार्टमेंट परीसर, विद्या नगर, वेडीमाता मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली़ सोमवारी सकाळी सात ते 11 दरम्यान स्वच्छता मोहिम राबवण्यात आली़ या मोहिमेत तब्बल 13 ट्रॅक्टर कच:याची विल्हेवाट लावण्यात आली़ या मोहिमेत उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, वसंत पाटील यांच्यासह प्रा़धीरज पाटील, गजराज फाउंडेशनचे विशाल ठोके, जीवनदायी बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तसेच वेडीमाता मंदिरातील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाल़े स्वच्छता मोहिमेसाठी पालिकेने दोन ट्रॅक्टर, जेसीबी मशिन व इतर साहित्य पुरवल़े
अस्वच्छतेमुळे शहराला लागलेला कलंक पुसण्यासाठी सामाजिक संस्थांनी स्वत:हून योगदान देत हाती झाडू घेतला आह़े राजकीय पदाधिका:यांनीदेखील हेवेदावे बाजूला सारून शहर स्वच्छतेसाठी एकत्र यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े