१३ वर्षीय मुलीवर प्रौढाचा अत्याचार
By admin | Published: February 27, 2017 01:09 AM2017-02-27T01:09:55+5:302017-02-27T01:09:55+5:30
जळगाव : घरात कोणी नसल्याची संधी साधत शेजारीच राहणाºया सुभाष तोताराम सोनवणे (वय ५५ रा.मेहरुण, जळगाव) या प्रौढाने १३ वर्षांच्या एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना मेहरुणमध्ये उघडकीस आली आहे
जळगाव : घरात कोणी नसल्याची संधी साधत शेजारीच राहणाºया सुभाष तोताराम सोनवणे (वय ५५ रा.मेहरुण, जळगाव) या प्रौढाने १३ वर्षांच्या एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना मेहरुणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित सोनवणे फरार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पीडीत मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून सुभाष सोनवणे हा तिच्या घरात गेला. प्रारंभी तिच्याशी गोड बोलून नंतर त्याने पीडितेवर अत्याचार केला. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने हा प्रकार संध्याकाळी कामावरुन घरी आलेल्या आईला सांगितला. समाजात बदनामी होईल, या हेतूने आईने दोन दिवस याबाबत कुठेच वाच्यता केली नाही. शनिवारी पतीला संपूर्ण घटना कथन केली.
एकीकडे बदनामीची भीती तर दुसरीकडे तक्रार केली नाही तर गुन्हा करणाºयाची हिंमत बळावू शकते. या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या पीडितेच्या पालकांनी शनिवारी पोलीस स्टेशन गाठले. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, सहायक निरीक्षक सचिन बागुल यांच्याकडे हकीकत कथन केली.रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या महिला उपनिरीक्षक सुजाता राजपूत यांना बोलावून पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेण्यात आला. त्यानंतर सुभाष सोनवणे याच्याविरुध्द कलम ३७६(२) (आय) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ४,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखलची कुणकुण लागताच संशयित फरार
पीडित मुलगी व तिचे आई वडील आपल्याविरुध्द तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्याचे समजताच सुभाष सोनवणे हा फरार झाला. गुन्हे शोध पथक त्याच्या शोधार्थ गेले असता तो घरी नव्हता, तसेच अन्य ठिकाणीही त्याचा शोध घेतला मात्र, तो मिळून आला नाही. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक कविता भुजबळ करीत आहेत. गेल्या वर्षीही मेहरुणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. पोलिसांनी त्याला लागलीच अटक केली होती.