दापोरा येथील आरोग्य तपासणी शिबिराचा 130 जणांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 06:32 PM2017-08-24T18:32:48+5:302017-08-24T18:33:33+5:30
गणपती हॉस्पिटल व जय बजरंग व्यायाम शाळा यांच्यातर्फे करण्यात आले होते हृदयरोग शिबिराचे आयोजन
ऑनलाईन लोकमत
दापोरा, जि.जळगाव, दि.24 - गणपती हॉस्पिटल व जय बजरंग व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 24 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात गावातील 130 जणांची तपासणी करण्यात येऊन 10 रुग्णांना मोफत उपचारासाठी जळगावात बोलविण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन सरपंच अर्चना सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच भगवान सोन्ने, जय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष महेंद्र सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात डॉ. साठे, डॉ. कल्पेश गांधी यांनी हृदयविकार, हृदयाच्या विविध शस्त्रक्रिया, अॅन्जिओप्लास्टी, फुफ्फुसरोग, डायलेसिस, संधीवात, ग्रंथीविकार असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचा 130 रुग्णांनी लाभ घेतला. त्यातील 10 जणांना जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यासाठी जळगाव येथे बोलविण्यात आले आहे. शिबिरासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नरेंद्र सोनवणे, कैलास नरवाडे यांच्यासह हटकर समाज प्रगती मंडळाच्या पदाधिका:यांचे सहकार्य लाभले.