राष्ट्रीयस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत १३० विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:27+5:302021-04-17T04:15:27+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील उपयोजित भूविज्ञान विभाग, भूजल सर्वेक्षण,विकास संस्था व औरंगाबाद येथील जियो-फोरम यांच्या ...

130 students participate in national level quiz competition | राष्ट्रीयस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत १३० विद्यार्थ्यांचा सहभाग

राष्ट्रीयस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत १३० विद्यार्थ्यांचा सहभाग

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील उपयोजित भूविज्ञान विभाग, भूजल सर्वेक्षण,विकास संस्था व औरंगाबाद येथील जियो-फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंवर्धन आणि जल-जनजागृती या विषयावर राष्ट्रीयस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्‍यात आली.

यावर्षी केंद्र शासनाच्या जलशक्ती सप्ताहानिमित्त पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालयीन तरुणांसाठी जलसंवर्धन आणि जल-जनजागृती या विषयावर राष्ट्रीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा ७ ते ९ एप्रिल या कालावधीत आयॊजित केली होती. या उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे १३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सर्वाना ई-प्रशस्तिपत्रक देण्यात आले, असे प्रा. डॉ. स. ना. पाटील यांनी सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनुपमा पाटील आणि प्रा. डॉ. प. स. कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले.

Web Title: 130 students participate in national level quiz competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.