बीएचआरच्या १४ आरोपींवर ठेवला गैरव्यवहाराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:17+5:302021-01-13T04:40:17+5:30

जळगाव : बीएचआर संस्थेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या ठेवींचा अपहार व फसवणूक केल्याच्या राज्यातील पाच गुन्ह्यांमध्ये सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर खटला ...

14 BHR accused charged with malpractice | बीएचआरच्या १४ आरोपींवर ठेवला गैरव्यवहाराचा आरोप

बीएचआरच्या १४ आरोपींवर ठेवला गैरव्यवहाराचा आरोप

Next

जळगाव : बीएचआर संस्थेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या ठेवींचा अपहार व फसवणूक केल्याच्या राज्यातील पाच गुन्ह्यांमध्ये सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर खटला सुरू होण्यासाठी मंगळवारी न्यायालयाने १४ संचालकांवर गैरव्यवहार व अपहाराचे आरोप ठेवले.

पुण्यातील राजगुरुनगर, शिवाजीनगर, इंदापूर व तळेगाव दाभाडे, तर जिल्ह्यातील पाचोरा या पाच पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांचा खटला सुरू झाला आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके बाजू मांडत आहेत. बीएचआर संस्थेकडून फसवणूक व अपहार प्रकरणात राज्यातील २२ जिल्ह्यांत ८१ गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचे खटले जळगाव न्यायालयात चालविले जाणार आहेत. याआधी ८ डिसेंबर रोजी सात गुन्ह्यांमधील दोषारोपपत्र न्या. आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात दाखल झाले आहे. आताही या पाच गुन्ह्यांचा खटला न्या. हिवसे यांच्याच न्यायालयात सुरू झाला आहे. या सर्व गुन्ह्यांत जळगावचेच १४ आरोपी असून, त्यात संस्थापक- चेअरमन प्रमोद रायसोनी याच्यासह १२ संचालक व एक व्यवस्थापक अशा १४ जणांचा सहभाग आहे. सर्व आरोपी जळगाव कारागृहात आहेत.

खटल्याची सुनावणी करताना न्या. आर. एन. हिवसे यांनी कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर झालेल्या १४ संशयित आरोपींना तुमच्यावर कट रचणे, फसवणूक, अपहार व एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल असून, त्या आधारावर दोषारोप ठेवण्यात येत असल्याचे सांगून, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे, गुन्हा कबुल आहे का? अशी विचारणा केली. त्यावर सर्वच संचालकांनी आम्हाला गुन्हा नाकबूल असल्याचे सांगितले.

यांच्यावर ठेवले आरोप

यात संस्थेचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी ( वय ५५, रा. बळीराम पेठ, जळगाव), दिलीप कांतिलाल चोरडीया (५१), सूरजमल भबुतमल जैन (५०), दादा रामचंद्र पाटील (६६), भागवत संपत माळी (६३), राजाराम काशिनाथ कोळी (४७), भगवान हिरामण वाघ (६०), यशवंत ओंकार जिरी (६०), शेख रमजान शेख, अब्दुल नबी मन्यार (५५), सुकलाल शहादू माळी (४५), ललिताबाई ऊर्फ लता राजू सोनवणे (३९, सर्व रा. तळेगाव, ता. जामनेर, मोतीलाल ओंकार जीरी (५०, रा. शेळगाव, ता. जामनेर), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (५२, रा. बेंडाळेनगर, प्रेमनगर, जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४०, रा. महाबळ, जळगाव) आदी.

असे आहेत पोलीस स्टेशननिहाय बीएचआरचे गैरव्यवहार

राजगुरुनगर,पुणे : २, ३०,००,०००

शिवाजीनगर, पुणे : ०७,०५,०६,६७०

इंदापूर, पुणे : ४,७७,९३,३९४

तळेगाव दाभाडे : ४०,५७,३००

पाचोरा : ८९,१८,३३८

या कलमान्वये ठेवले आरोप

कलम व्याख्या

१२० ब : कट रचणे

४२० : फसवणूक

४०६ : अपहार

४०८ : (व्यवस्थापक असताना अपहार केला)

हे कलम फक्त सुखलाल माळी याला लागू आहे.

४०९ : जबाबदारी टाळून गुन्हेगारी कट

(हे कलम व्यवस्थापक वगळता सर्वांना लागू)

२०१ : पुरावा नष्ट करणे, कागदपत्रे गहाळ करणे

एमपीआयडी ३ : महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण तसेच ठेवींची व्याजासह परतफेड केली नाही.

Web Title: 14 BHR accused charged with malpractice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.