१४ बैलगाड्या घेतल्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 05:39 PM2019-05-27T17:39:47+5:302019-05-27T17:40:00+5:30
अमळनेर : भेंडा साखर कारखान्यावर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या १४ बैल जोड्या व गाड्या नेत परस्पर विकून सुमारे तीन लाखांमध्ये ...
अमळनेर : भेंडा साखर कारखान्यावर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या १४ बैल जोड्या व गाड्या नेत परस्पर विकून सुमारे तीन लाखांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील ठेकेदार बाळासाहेब ताके याला अमळनेर पोलिसांनी अटक केली अहे. यावेळी त्याच्याकडून १४ बैलगाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, प्रभाकर पाटील रा. आटाळे यांच्यासह ढेकू व पिंपळे येथील शेतकºयांकडून अहमदनगर जिल्हयातील शेवगाव तालुक्यातील दहिगावणे येथील बाळासाहेब ताके याने भेंडा साखर कारखान्याचा ऊस तोडण्यासाठी अमळनेर तालुक्यातील शेतकºयांच्या १४ बैल जोड्या व गाड्या कराराने भाड्याने घेतल्या होत्या. मात्र काम संपल्यानंतरही त्याने त्या परत केल्या नाहीत. उलटपक्षी नेहमी शिवीगाळ करायचा आणि शेतकºयांना १२ लाख ९३ हजार रुपये वसूल करण्याची नोटीस दिली होती. तर बाळासाहेब ताके याने त्या बैलजोड्या व गाड्या परस्पर विकून २ लाख ८५ हजार रुपयाचा अपहार करून शेतकºयांची फसवणूक केली असल्याने अमळनेर पोलिसात भादवी ४०६ , ४२० व ५०७ प्रमाणे फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांना कारखान्यावर पाठवून आरोपी बाळासाहेब ताके याला अटक केली व त्याच्याकडून शेतकºयांच्या१४ बैलगाड्या ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान ताके याने बैलजोड्या मात्र बाजारात विकून टाकल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. ऐन दुष्काळात शेतकºयाची फसवणूक झाली होती मात्र पावसाळ्यापूर्वी मशागती साठी किमान गाड्या मिळाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.