खासगी डॉक्टरांसह १४ कर्मचारी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 12:06 PM2020-07-08T12:06:17+5:302020-07-08T12:06:57+5:30

शहरात ९२ रुग्ण : नवे हॉटस्पॉट समोर

14 employees including private doctors affected | खासगी डॉक्टरांसह १४ कर्मचारी बाधित

खासगी डॉक्टरांसह १४ कर्मचारी बाधित

Next

जळगाव : शहरातील प्रतापनगरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर, त्यांची मुलगी व रुग्णालयातील १४ कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे़ हे सर्व आधीच्या बाधित कर्मचाºयाच्या संपर्कातील आहेत़ दरम्यान, शहरात मंगळवारी तब्बल ९२ रुग्णांची नोंद करण्यात आली असून यातील ५७ रुग्णांची माहिती समोर आली आहे.


जळगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग थांबतच नाही, ज्या भागात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले होते़ अशा भागांमध्ये आता रुग्ण आढळत आहेत़ कांचननगरात ७ रुग्ण आढळून आले असून हा एक नवीन हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे.


शहरातील तिघांसह जिल्ह्यात ११ मृत्यू
जळगाव शहरातील ६० वर्षीय वृद्धासह ७० व ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून यासह जळगाव तालुका २, रावेर ३, एरंडोल, जामनेर, चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे़

या ठिकाणी आढळले रूग्ण
कांचननगर ७, मेहरूण ६, सिंधी कॉलनी ५, इंद्रप्रस्थ कॉलनी ४ यासह प्रतापगरातील खासगी रुग्णालयात व शहरासह विविधी ठिकाणी रहिवासाला असलेले असे १४ जण, खोटेनगर, एमाआयडीसी, प्रेमनगर, इंद्रप्रस्थनगर, शिवाजीनगर, प्रेमनगर, गेंदालाल मील, रुख्मीणी नगर, भूषण कॉलनी, बसस्टँड परिसर, मयूर कॉलनी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे़

- जिल्हाभरातून मंगळवारी १११ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले़ बरे झालेल्यांची संख्या २८२८ असून १६८२ रुग्ण उपचार घेत आहेत़ शहरातील ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे़

Web Title: 14 employees including private doctors affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.