१४ जुगाऱ्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:54 PM2019-03-11T12:54:00+5:302019-03-11T12:54:53+5:30
अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त
जळगाव : अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या पथकाने रविवारी दुपारी असोदा, ता.जळगाव येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यात १४ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल मिळून २ लाख ४९ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाई खेडी येथे पोलिसांवर दगडफेक केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एक आरोपी मिळून आला. त्याला अटक करण्यात आली आहे.
असोदा येथे शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी त्यांच्या कार्यालयातील वाचक सहायक निरीक्षक सचिन बागुल, सुनील दामोदरे, विजय सोनवणे, अजय पाटील व शेख रफिक शेख कालू यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना केले होते. या पथकाने मिलिंद दौलत बिºहाडे, संदीप अमृत पाटील, अनिल सुरेश शिंदे, चंदन रमेश भंगाळे, योगेश अशोक पाटील, प्रकाश चिंधू कोळी, किशोर अशोक सोनवणे, छोटू खंडू पाटील, तुळशीराम शंकर कोळी, अरुण गिरधर कोळी, योगेश डिंगबर कोल्हे, विक्रम पंडित पाटील, ललित निवृत्ती चौधरी व रितेश रवींद्र पाटील यांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांची लागलीच जामीनावर मुक्तता झाली.
पोलिसांवर दगडफेक करणाऱ्याला एकाला अटक
या कारवाईत तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात फरार असलेल्या योगेश डिगंबर कोल्हे (३०) याला लागलीच अटक करण्यात आली. पंधरा दिवसापूर्वी पोलिसांचे पथक अवैध वाळूच्या विरोधात खेडी येथे कारवाईसाठी गेले असता या पथकावर दगडफेक झाली होती. त्यात योगेशचा सहभाग होता. तपासाधिकारी गणेश चव्हाण यांनी त्याला सायंकाळी अटक केली.