१४ लाख लंपास, सात लाख सुरक्षित; कोठे मारला चोरट्यांनी डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 01:11 PM2020-07-12T13:11:15+5:302020-07-12T13:11:47+5:30

जळगाव : महामार्गावर असलेल्या शिव कॉलनीमध्ये एटीएम फोडून १४ लाखाची रोकड लांबविली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दुसऱ्या ...

14 lakh lamps, seven lakh safe | १४ लाख लंपास, सात लाख सुरक्षित; कोठे मारला चोरट्यांनी डल्ला

१४ लाख लंपास, सात लाख सुरक्षित; कोठे मारला चोरट्यांनी डल्ला

Next

जळगाव : महामार्गावर असलेल्या शिव कॉलनीमध्ये एटीएम फोडून १४ लाखाची रोकड लांबविली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दुसऱ्या एटीएम मशीनमधील ७ लाख सुरक्षित राहिले. गॅस कटरच्या सहायाने मशीन कापण्यात आले. या प्रकरणातमध्ये आंध्र प्रदेशातील टोळीचा संशय असून तीन जण सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह नरेंद्र वारुळे, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, रामचंद्र बोरसे आदींनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

Web Title: 14 lakh lamps, seven lakh safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.