शहरात १४ नवे कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:24+5:302021-05-30T04:14:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात शनिवारी कोरोनाचे १४ नवे बाधित आढळून आले असून यात ॲन्टीजन चाचणीत ११ तर ...

14 new corona affected in the city | शहरात १४ नवे कोरोना बाधित

शहरात १४ नवे कोरोना बाधित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात शनिवारी कोरोनाचे १४ नवे बाधित आढळून आले असून यात ॲन्टीजन चाचणीत ११ तर आरटीपीसीआरच चाचण्यांमध्ये ३ रुग्ण समोर आले आहे. ३८ रुग्ण बरेही झाले असून १ बाधिताच्या मृत्यूची नोंद आहे. दरम्यान, कोरोना जिल्ह्यात कमी होत असून जिल्ह्यात दहा तालुक्यांमध्ये दहा किंवा त्यापेक्षा कमी रुग्णसंख्या शनिवारी नोंदविण्यात आली आहे.

शनिवारी एरंडोल तालुका सोडला तर सर्वच तालुक्यांध्ये २० पेक्षा कमी रुग्ण आहेत. यातील अमळनेर, भडगाव, धरणगाव या तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

चाचण्या वाढल्या

आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. शनिवारी आरटीपीसीआरचे ४०३४ अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर २६२९ अहवाल समोर आले आहेत. यात ४९ बाधित आढळून आले आहेत. तर ॲन्टीजनच्या ४७८६ चाचण्या झाल्या असून त्यात ११७ बाधित आढळून आले आहेत. चाचण्या वाढल्याने प्रलंबित अहवालांची संख्याही वाढली आहे. ही संख्या २२८३ वर पोहोचली आहे.

सक्रिय रुग्ण सर्वात कमी असलेले तालुके

भडगाव ५८

धरणगाव १९४

पारोळा १९८

अमळनेर २१४

जळगाव ग्रामीण २३५

पाचोरा २४२

रुग्णालयात १६ टक्केच रुग्ण

जिल्हाभरात सक्रिय रुग्णांची संख्या ही ६१८१ वर आली आहे. नियमीत बरे होणारे अधिक व नवीन रुग्ण कमी असे समीकरण समोर येत असल्याने ही सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. दरम्यान, सक्रिय रुग्णापैकी ४८९५ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. उर्वरित १२९६ रुग्णांपैकी २५५ रुग्ण हे कोविड केअर सेंटर अर्थात आयसोलेशनमध्ये आहे. कोविड रुग्णालयांमध्ये आता केवळ १६ टक्के अर्थात १०४१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी १४२ रुग्ण हे जीएमसीत दाखल आहेत.

Web Title: 14 new corona affected in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.