१४ नायब तहसीलदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:24 PM2019-06-01T12:24:47+5:302019-06-01T12:25:19+5:30

१४६ कर्मचाऱ्यांपाठोपाठ नायब तहसीलदारांच्याही बदल्यांचे आदेश

14 Nyab tahsildar transfers | १४ नायब तहसीलदारांच्या बदल्या

१४ नायब तहसीलदारांच्या बदल्या

Next

जळगाव : महसूल विभागातील बदलीसत्रामध्ये १४६ कर्मचाऱ्यांपाठोपाठ शुक्रवारी १४ नायब तहसीलदारांच्याही बदल्या करण्यात आल्या असून तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले.
मे महिन्यात होणाºया बदल्यांमध्ये ३० मे रोजी ६६ लिपिक, २२ मंडळ अधिकारी, ५८ अव्वल कारकून यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर एका पदावर तीन वर्षे पूर्ण झालेल्या नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. यामध्ये ३१ मे रोजी जिल्ह्यातील १४ नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.
बदली झालेले नायब तहसीलदार (कंसात नियुक्तीचे ठिकाण)
अधिकार पेंढारकर, चोपडा (उप विभागीय कार्यालय, चाळीसगाव), कल्पना पाटील, निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय (स्वागत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय), एन.झेड. वंजारी, संगायो पारोळा (महसूल शाखा, पारोळा), एस.वाय. साळुंखे, संगायो (उपविभागीय कार्यालय, फैजपूर), जी.ई. भालेराव, चाळीसगाव (भडगाव), एस.एस. भावसार, चाळीसगाव (एरंडोल), आर.एस. जोशी, अमळनेर (एरंडोल), डी.एम. वाडीले, अमळनेर (धरणगाव), बी.डी. वाडिले, बोदवड (भुसावळ), एस.एस. निकम, संगायो भुसावळ (निवडणूक शाखा, भुसावळ), सी.बी. देवराज, एरंडोल (जळगाव), सी.जी. पवार, जळगाव (रावेर), आर.आर. ढोले, अमळनेर (चाळीसगाव), मुकेश हिवाळे, भडगाव (पाचोरा).
बदल्यांचे हे आदेश काढल्यानंतर संंबधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी बदली झालेल्या नायब तहसीलदारांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करावे व पदस्थापना देण्यात आलेल्या ठिकाणी संबंधित नायब तहसीलदारांना रुजू करून घेत अहवाल सादर करण्याचे सूचित केले आहे.
यानंतर आता इतर अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश शासनाच्या निर्देशानुसार वरिष्ठ पातळीवरून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: 14 Nyab tahsildar transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव