खडसेंसोबत १४ अधिकारी गोत्यात; तीन उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 06:22 AM2023-10-20T06:22:48+5:302023-10-20T06:23:03+5:30
सातोडमधील जमिनीतून अवैधरित्या १ लाख १८ हजार २०२.१५८ ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर तहसीलदारांनी एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, सून व खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे यांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सातोड (मुक्ताईनगर) शिवारातून बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना १३७ कोटींची दंडाची नोटीस पाठविण्यात आली आहे. या गौण खनिजाच्या ढिगाऱ्याखाली उत्खननासह अन्य प्रक्रियेत उपजिल्हाधिकाऱ्यांसह १४ जण अडकले आहेत. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
सातोडमधील जमिनीतून अवैधरित्या १ लाख १८ हजार २०२.१५८ ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर तहसीलदारांनी एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, सून व खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे यांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या गौण खनिजाच्या उत्खननप्रकरणी राज्य शासनाने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले होते. या पथकात तत्कालिन जिल्हाधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत कोरके, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक मुगूटराव मगर व नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक राजेश पाटील यांनी ही चौकशी केली होती.
त्यानुसार या पथकाने सादर केलेल्या अहवालावर विभागीय आयुक्तांनी मत नोंदविले होते. त्यात ३ उपजिल्हाधिकाऱ्यांसह १४ जणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांची विभागीय चौकशी होणार आहे.
खडसे परिवारातील चारजणांना नोटिसा
रोहिणी खडसे
३०लाख १७६४३
मंदाकिनी खडसे
२२ कोटी०११५६८०
एकनाथ खडसे
४८कोटी ७६७५२८०
रक्षा खडसेंसह तीन जण
६६कोटी ०७७३२८०