प्लक्झरी बस उलटून १४ प्रवासी जखमी
By admin | Published: January 14, 2017 12:59 AM2017-01-14T00:59:33+5:302017-01-14T00:59:33+5:30
भोकरबारी धरणाजवळील घटना : कुटीर रुग्णालात उपचार, अपघात होताच चालक-सहचालक फरार
ाारोळा : समोरून येणाºया वाहनाला साईड देताना वाहनावरील ताबा सुटल्याने, लक्झरी बस रस्त्याखाली उतरून झाडाला धडक देत खड्यात पलटी झाली. यात बसमधील १४ प्रवाशी जखमी झाले. हा अपघात अमळनेर-पारोळा रस्त्यावरील भोकरबारी धरणाजवळ आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झाला. अपघातानंतर चालक, सहचालक वाहन सोडून फरार झाले.
अमळनेरहून पारोळ्याकडे खाजगी लक्झरी बस (एमएच १९-वाय. ७०७१) येत होती. भोकरबारी फाट्याजवळून चालकाने लक्झरी बस सहचालकाला (क्लिनर) चालविण्यास दिली. त्याने थोड्या अंतरापर्यंत बस चालवली. समोरून येणाºया वाहनाला साईड देण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या खाली उतरत, झाडावर जाऊन आदळली. त्यानंतर दोन-तीन पलट्या खात २० ते २५ फूट खड्यात गेली. ही बस झाडावर आदळली नसती,तर बस जवळच असलेल्या विहिरीत पडली असती.
प्रवाशांचा आक्रोश
बसमध्ये जवळपास २० ते २२ प्रवाशी होते. बस पलटी होताच, जखमी महिला, पुरुष, लहानमुले यांनी आक्रोश केला हाता.
बस पलटी होताच आजुबाजुच्या शेतात काम करणाºया शेतकरी तसेच डॉ. गोपाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना खाजगी गाडीतून कुटीर रुग्णालयात पोहचविले. यावेळी बुलढाणा अर्बन बॅँकेचे विभागीय व्यवस्थापक रमेश पवार यांनी स्वत:च्या गाडीतून जखमींना रुग्णालयात पोहचविले. घटनास्थळी चप्पल, पिशव्या, यांचा खच पडलेला होता.
कुटीरमध्ये उपचार
जखमींवर कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. धनंजय पाटील, डॉ. तुषार रनाळे, डॉ. सुनील पारोचे, डॉ. राहुल जैन, आदींनी प्रथमोपचार केले.
आठ जखमींना धुळ्याला हलविले
या अपघातातील कमलाबाई सोनवणे, नामदेव भोई, गणेश निकम, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, वेणूबाई जगताप, राजेंद्र पाटील, समाधान पाटील यांना रोशन पाटील, ईश्वर ठाकूर, दीपक सोनार यांनी रुग्णवाहिकेतून धुळ्याला हलविले.
महामंडळाच्या कर्मचाºयांचे दुर्लक्ष
अपघात स्थळापासून त्याचवेळी एस.टी.महामंडळाच्या बसेस् गेल्या. मात्र महामंडळाच्या चालकांनी बस थांबविण्याचे सौजन्य दाखविले नाही. एस. टी.महामंडळाचे तिकीट तपासणी पथकाचे अधिकारीही घटनास्थळावरून गेले मात्र त्यांनीही या जखमींकडे दुर्लक्ष केले.
चालक-सहचालक फरार
बस झाडावर आदळताच, चालक, सहचालकाने बसमधून उड्या घेत अपघातस्थळावरून पळ काढला.
पोलिसांतर्फे पंचनामा
अपघात झाल्यानंतर बºयाच वेळाने पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करण्याचे काम केले. मात्र रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद झालेली नव्हती. (वार्ताहर)
अपघातात कमलाबाई राजू सोनवणे (५०), देवयानी राजू सोनवणे (१७),सागर राजू सोनवणे (१३, सर्व रा.जळगाव), राजेंद्र नामेदव पाटील (३५), चुनीलाल हरि पाटील (४५, रा.वेल्हाणे, ता.पारोळा), नामदेव छगन भोई (२५, रा. उत्राण,ता. एरंडोल), गणेश प्रल्हाद निकम (३०, पाळधी), समाधान रमेश पाटील (१७), गुलाब बाळू पाटील (१९), महेंद्र शंकर पाटील (३०, दोन्ही रा.भोकरबारी),वेणुबाई गणपत जगताप (७०,पारोळा), निकिता कैलास ठाकरे (१९), अशोक दगडू मोरे (४३,वावडे,ता.अमळनेर), राजेंद्र निंबा पाटील (पारोळा) यांचा समावेश आहे.