अहिराणी भाषेतील १४ ज्येष्ठ साहित्यिकांना' साहित्यिक गुरू गौरव' पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 10:00 AM2021-07-24T10:00:19+5:302021-07-24T10:01:03+5:30

हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेला ऑनलाईन झाला.

14 senior writers of Ahirani language honored with 'Literary Guru Gaurav' award | अहिराणी भाषेतील १४ ज्येष्ठ साहित्यिकांना' साहित्यिक गुरू गौरव' पुरस्काराने सन्मानित

अहिराणी भाषेतील १४ ज्येष्ठ साहित्यिकांना' साहित्यिक गुरू गौरव' पुरस्काराने सन्मानित

Next



अमळनेर : उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित, जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषदेतर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त अहिराणी भाषेतील ज्येष्ठ १४ साहित्यिकांनासाहित्यिक 'गुरू गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२३ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाईन झालेल्या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मानसशास्रज्ञ डॉ.आरती सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्ष नेते नामदेव ढाके होते.
यावेळी समारंभाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी खान्देशी माणसाचे गुणगाण सांगितले की, खान्देशी माणूस जिद्दी व कामाच्या चिकाटीमुळे प्रत्येक मोठ्या शहरात वसला आहे, असे सांगत अहिरानी भाषा लुप्त होऊ नये म्हणून येणाऱ्या पिढ्यांनाही अहिरानीचे धडे देण्याचे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवडचे नगरसेवक नामदेव ढाके यांनी व आयुक्त राजेश पाटील यांनी पुण्यात खान्देश भवन निर्मितीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासीत केले. यावेळी ए.जी.पाटील, डॉ.आरती सूर्यवंशी, बापूसाहेब हटकर, प्रा.सदाशिवराव माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

पुरस्कार्थि असे-
प्राचार्य सदाशिवराव माळी, कृष्णा आनंदा पाटील, सुभाष अहिरे, डॉ.उषा सावंत, विमल वाणी, सुरेश आर.पवार, रामदास वाघ, बापूसाहेब देवीदास हटकर, डॉ. रमेश सूर्यवंशी, डॉ. सुधीर देवरे, प्रकाश पाटील, पिंगळवाडेकर, शकुंतला पाटील, रोटवदकर, नारायण हरी महाजन, रत्ना पाटील या साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सन्मान सोहळ्याचा उद्देश उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केला. मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय अहिरानी परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सन्मान पत्राचे वाचन वर्षा पाटील व एम.के भामरे यांनी केले. ऑनलाईन कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबी भिला पाटील व प्रशांत पाटील यांनी सांभाळल्या.
सूत्रसंचालन बापूसाहेब पिंगळे व प्रा.प्रकाश माळी यांनी, तर पी.झेड.कुवर यांनी आभार मानले.

Web Title: 14 senior writers of Ahirani language honored with 'Literary Guru Gaurav' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.