जळगाव जिल्हा नियोजन समितीवर १४ जण ‘विशेष निमंत्रित’ सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:20 PM2019-07-13T12:20:05+5:302019-07-13T12:23:49+5:30
आदेश प्राप्त
जळगाव : जिल्हा नियोजन समितीवर (डीपीडीसी) जिल्ह्यातील १४ जणांची ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे. या विषयी संबंधितांना कळविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीवर ‘विशेष निमंत्रित’ सदस्य म्हणून निवड करायची असल्याने त्या विषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिवांनी शासनाला ७ फेब्रवारी रोजी पत्र दिले होते. त्यानुसार शासनाने ही नियुक्ती केली.
निवड करण्यात आलेले सदस्य
धर्मराज रामा वाघ (दहीवद, ता. चाळीसगाव), गजेंद्र अरविंद जायसवाल (चोपडा), रावसाहेब रतनसिंग गिरासे (बोळे, ता. पारोळा), पंकज पंडित चौधरी ( अमळनेर), पद्माकर काशिनाथ महाजन ( रसलपूर, ता. रावेर), मनोहर गिरधर खैरनार ( मुक्ताईनगर), तुषार किसन राणे ( सालबर्डी, ता. मुक्ताईनगर), अॅड. साहेबराव धर्मा सोनवणे ( चोपडा), भागचंद मोतीलाल जैन ( जळगाव), अरुण रुपचंद पाटील (कुºहाड बु. ता. पाचोरा), सुरेश माणिक सोनवणे (जळगाव), हिरालाल व्यंकट चौधरी ( वनोली, पाडळसे, ता. यावल), समाधान लक्ष्मण पाटील (कुºहे, ता. भुसावळ), जगन्नाथ खंडू चव्हाण (जामनेर).