चाळीसगावातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत १४० विद्यार्थ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 04:06 PM2018-01-19T16:06:55+5:302018-01-19T16:09:15+5:30
बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात आयोजित कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान स्पर्धेत १४० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव : दि.१९ : बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात आयोजित कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान स्पर्धेत १४० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी ११ वा. स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल होते. व्यासपिठावर नॅशनल केमिकल लॅब पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.उल्हास के.खारुळ, संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, डॉ.एम.बी. पाटील, शामलाल कुमावत, डॉ.सुनील राजपुत, राजेंद्र चौधरी, क.मा.राजपुत, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, प्रा.डी.डी.जोशी उपस्थित होते.
जागतिक स्पर्धेत टिकायचे असले तर, प्रचंड परिश्रम करण्याची तयारी ठेवा. संगणक व इंटरनेटमुळे ग्रामीण आणि शहरी अशी दरी मिटली आहे. सर्वांनाच अनेक संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घ्यावा, असे मत डॉ.उल्हास खारुळ यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा पत्र पाठवून महाविद्यालयाचे कौतुक केले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक फायदा व्हावा म्हणूनच गेल्या २५ वर्षांपासून आम्ही स्पर्धा राबवित असल्याचे नारायणदास अग्रवाल यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.डॉ. किरण गंगापुर यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. पी.एस. बाविस्कर यांनी मानले.
उद्या दुपारी समारोप
स्पर्धेचा समारोप शनिवारी दु. ४ वाजता होत आहे. उमविचे प्र. कुलगुरु डॉ. पी.पी.माऊलीकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल. अध्यक्षस्थानी मॅनेजमेंट बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणुन संस्थाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर हे उपस्थित असतील.