1400 हॉकर्सचे बायोमेट्रिक सव्रेक्षण!

By admin | Published: February 23, 2016 12:19 AM2016-02-23T00:19:22+5:302016-02-23T00:19:22+5:30

धुळे : शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या हालचाली गतिमान झाल्या असून 1400 नोंदणीकृत हॉकर्सचे आजपासून बायोमेट्रिक सव्रेक्षण केले जाणार आह़े

1400 hawkers biometric survey! | 1400 हॉकर्सचे बायोमेट्रिक सव्रेक्षण!

1400 हॉकर्सचे बायोमेट्रिक सव्रेक्षण!

Next

धुळे : शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या हालचाली गतिमान झाल्या असून 1400 नोंदणीकृत हॉकर्सचे आजपासून बायोमेट्रिक सव्रेक्षण केले जाणार आह़े त्यानंतर संबंधित हॉकर्सला ओळखपत्र देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाणार आह़े हॉकर्स झोनचा विषय जागेबाबत सुचविण्यात आलेले फेरबदल करून पुन्हा महासभेला सादर केला जाणार आह़े

गेल्या वर्षी मे महिन्यात आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांनी आग्रा रोडवरील हॉकर्सला पळवून लावले होत़े काही दिवस पोलीस बंदोबस्त तैनात करून आग्रा रोड मोकळा करण्यात आला होता़ परंतु काही दिवसातच परिस्थिती

या कामासाठी नेमण्यात आलेल्या ठाणे येथील एजन्सीला सहा महिन्यांची मुदत दिली जाणार आह़े दुसरीकडे हॉकर्स झोनसाठी मनपा प्रशासनाने सुचविलेल्या काही जागांना महासभेत विरोध झाल्याने नव्याने सुचविण्यात येणा:या जागांचा समावेश करून हा प्रस्ताव नव्याने महासभेसमोर ठेवला जाणार आह़े महासभेत हॉकर्स झोनसाठीच्या जागा अंतिम झाल्यानंतर तत्काळ हॉकर्सच्या पुनर्वसनाला सुरुवात केली जाईल़ दुसरीकडे महासभेचा ठराव शासनाला सादर करून हॉकर्स व नो हॉकर्स झोन निर्मितीबाबत मंजुरी घेतली जाईल़ त्यानुसार हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोन जाहीर केले जातील़ हॉकर्स झोनचा प्रश्न सोडवितानाच पार्किगचा प्रश्नदेखील प्राधान्याने सोडविण्याचा विचार केला जात आह़े

जैसे थेझाली़ त्यानंतर हॉकर्स झोनचा विषय सातत्याने अजेंडय़ावर राहिला आह़े दरम्यान, आयुक्तांच्या आदेशानुसार बायोमेट्रिक सव्रेक्षणासह पुनर्वसन करण्याबाबत मनपाकडे नोंदणी करण्यासाठी हॉकर्सकडून प्रत्येकी 1 हजार रुपये दंड व 300 रुपये बाजार शुल्क वसूल करण्यात आल़े 1400 हॉकर्सनी मनपाकडे दंड व बाजार शुल्काची रक्कम भरून नोंदणी केली आह़े त्यातून मनपाला 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आह़े संबंधित नोंदणीकृत हॉकर्सचे बायोमेट्रिक सव्रेक्षण करून त्यांच्या डोळे व हातांच्या ठशांचे नमुने घेतले जाणार आहेत़ ही सर्व माहिती संगणकीकृत अपलोड करून त्यानंतर हॉकर्सला ओळखपत्र व स्वतंत्र क्रमांक दिले जातील़ या नंबरच्या आधारे हॉकर्सचे पुनर्वसन केले जाणार आह़े ज्या हॉकर्सनी मनपाकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनादेखील ऐनवेळी 1 हजार 300 रुपये भरून सव्रेक्षणात सहभागी होता येणार आह़े

Web Title: 1400 hawkers biometric survey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.