जळगाव जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटींचा निधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:03 AM2018-02-15T00:03:33+5:302018-02-15T00:06:05+5:30
मुख्यकार्यकारी अधिकाºयांची माहिती
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १४ - जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या नवीन इमारत बांधकाम, देखभाल व दुरुस्तीसाठी शासनाने १५ कोटींचा भरीव निधी देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या नवीन इमारत बांधकाम, देखभाल तसेच दुरुस्तीसाठी करोडोच्या निधीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शासनाकडून १५ कोटी निधीची मागणी करण्यात आली होती. शासनानेदेखील याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे विभागीय कार्यालयात जि.प.च्या अधिकाºयांची बैठक झाली, त्यावेळी आरोग्यासह इतर विभागासाठी भरीव निधीची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार मिळणारा १५ कोटींचा निधी मिळणार असल्याने २०१८-१९ या वषार्साठी हा निधी राहणार आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत आरोग्य विभागासाठीच्या निधीत तिप्पट वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आरोग्यासाठी केवळ ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यावर्षी १५ कोटी रुपये मिळणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीर्ण इमारतींची दुरुस्ती, नव्याने मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामासाठी निधी खर्च करण्यात येणार आहे.
ग्रामीण रस्ते व शहरी रस्त्याच्या एकूण १०३ कामांसाठी १९ कोटींच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील २८ तर शहरी भागातील ७५ कामे होणार आहे. कामास प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळेच्या नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठीदेखील साडेचार कोटींची तर अंगणवाडी बांधकामासाठी साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा अद्याप हगणदारी मुक्त झालेले नसल्याने शौचालयासाठी नव्याने ७५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. नुकतीच दिल्ली येथे सचिांसोबत बैठक झाली. यावेळी दिवेगावकर यांनी शौचालयासाठी ७५ कोटींची नव्याने मागणी केली होती. ६ मे रोजी केवळ १७ हजार ६०० फोटो अपलोडींग झाले होते. यात वाढ झाली असून सद्यस्थितीत १ लाख ६९ हजार फोटो अपलोड झाले असल्याने दिल्ली येथे सचिवांनी समाधान व्यक्त केल्याचे दिवेगावकर यांनी सांगितले. १० महिन्यात ५ तालुके पूर्णत: हगणदारीमुक्त झाले असल्याचेही सांगण्यात आले.