खेडीतील माऊली नगरात १५ जुगारींना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:16 AM2021-04-22T04:16:07+5:302021-04-22T04:16:07+5:30

एलसीबीची कारवाई : साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त जळगाव : खेडी येथील माऊली नगरात देवाबाई रमेश कोळी यांच्या घरात ...

15 gamblers caught in Mauli town | खेडीतील माऊली नगरात १५ जुगारींना पकडले

खेडीतील माऊली नगरात १५ जुगारींना पकडले

Next

एलसीबीची कारवाई : साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : खेडी येथील माऊली नगरात देवाबाई रमेश कोळी यांच्या घरात सुरू असलेला जुगार अड्डा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उधळून लावला त्यात पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ५ लाख ३८ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १८ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता झाली.

खेडीतील माऊली नगरात गणेश अर्जुन कोळी हा देवाबाई रमेश कोळी यांच्या घरात जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, श्रीकृष्ण पटवर्धन, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, संदीप साबळे, विजय शामराव पाटील, अविनाश देवरे, पंकज शिंदे व मुरलीधर बारी यांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. तेथे १५ जणांना जुगार खेळताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ५६ हजार ९३० रुपये रोख, १ लाख २२ हजार रुपये किमतीचे १३ मोबाइल, तसेच ३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी असा एकूण ५ लाख ३८ हजार ९३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यांच्यावर झाली कारवाई

गणेश अर्जुन कोळी (४२, रा.अयोध्या नगर), राजू चत्रू बंजारा (४७, रा.रायपूर), युवराज मधुकर मोरे (रा. कुसुंबा), आकाश सुरेश बत्तीसे (२६, बिजासनी नगर)विशाल गणेश भांडारकर (३०,सम्राट कॉलनी), सचिन दीपक तायडे (२५), मनोज शंकर कोळी (३२), नीलेश उखा पवार (२६), नितीन प्रकाश सोनवणे (३०), सर्व रा. अयोध्या नगर, महेश चंद्रभान सूर्यवंशी (३४ रा.खेडी), रोशन विजय जैन (३०, रा.गुरुकुल सोसायटी,जळगाव), विजय कमलाकर सपकाळे (२५, मेस्को माता नगर),संतोष दयाराम पाटील (३४, जुना असोदा रोड), दुर्गेश अरुण पाटील (३०,रा. अयोध्या नगर) व अमोल राजेंद्र सोनार (३१,रा. अयोध्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार पंकज शिंदे यांनी फिर्याद दिली.

Web Title: 15 gamblers caught in Mauli town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.