क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करुन जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून तरुणाची १५ लाखात फसवणूक

By सागर दुबे | Published: April 26, 2023 06:15 PM2023-04-26T18:15:40+5:302023-04-26T18:15:58+5:30

नोकरी देण्याच्या बहाण्याने मॅसेज करुन सायबर ठगाने शहरातील पवन बळीराम सोनवणे (वय २५, रा. देविदास कॉलनी) या तरूणाशी टेलिग्राम साईटवरुन संपर्क वाढवला.

15 lakh fraud of young man by promising high profit by investing in crypto currency | क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करुन जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून तरुणाची १५ लाखात फसवणूक

क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करुन जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून तरुणाची १५ लाखात फसवणूक

googlenewsNext

जळगाव: नोकरी देण्याच्या बहाण्याने मॅसेज करुन सायबर ठगाने शहरातील पवन बळीराम सोनवणे (वय २५, रा. देविदास कॉलनी) या तरूणाशी टेलिग्राम साईटवरुन संपर्क वाढवला. त्यानंतर क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करुन जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून १५ लाख ३५ हजार रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पवन हा मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. १२ एप्रिल २०२३ रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन पवनला जॉब ऑफर करणारा मॅसेज आला. त्यावर रिप्लाय केला असता पवनला युट्युब लिंक पाठवल्या. या लिंकवरुन नंतर टेलिग्राम युझर आयडी दिला. पवनचा विश्वास संपादन करण्यासाठी ठगाने दोन हजार रुपये बोनस पवनच्या बँक खात्यात जमा केला.

यानंतर क्रिप्टो करंन्सीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा प्राप्त करुन देतो, असे आमिष तसेच खोटे आश्वासन संबंधितांनी पवन यास दिले. या बदल्यात पवन याच्याकडून संबंधितांनी २२ एप्रिलपर्यंत वेळोवेळी तब्बल १५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन स्विकारली. त्या मोबदल्यात कोणतीही रक्कम पवन यास परत केली नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने मंगळवारी सायबर पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर करीत आहेत.

Web Title: 15 lakh fraud of young man by promising high profit by investing in crypto currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.