चोपडा येथे पुन्हा १५ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 09:17 PM2020-06-13T21:17:24+5:302020-06-13T21:18:28+5:30
येथून तपासणीसाठी गेलेल्या रुग्णांच्या स्वॅबपैकी ४७ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले.
चोपडा : येथून तपासणीसाठी गेलेल्या रुग्णांच्या स्वॅबपैकी ४७ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या चोपडा येथे शासकीय आकडेवारीनुसार ११६ झाली आहे. १० रुग्ण जळगाव जिल्ह्याबाहेर खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी गेलेले आहेत. असे एकत्रित चोपडा तालुक्यात १२६ रुग्ण कोरोनाचे पॉझिटिव्ह आलेले आहेत.
तसेच अमळनेर येथील एक महिला चोपडा येथे तपासणीसाठी आली असता त्या महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चोपडा शहरातील पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील अर्थात पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या कुटुंबातील संजीवनी नगर भागातील चार रुग्ण तर त्यांच्या शेजारी असलेल्या कुटुंबातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. एकाच कुटुंबातील रुग्णांमध्ये आणि शेजारी आलेला रुग्णांमध्ये सर्व महिलांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील चार महिलांमध्ये ४८, २८ व २७ आणि दोन वर्षे वयाची बालिका रुग्ण आहेत.
बाधित कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्यांमध्ये एक २५ वर्षे वयाची महिला बाधित आली आहे. मेन रोडवरील पूर्वी बाधित असलेल्या कुटुंबांचे शेजारील चुलत नातेवाईकांमध्ये ४५ आणि २१ वर्षे वयाचे पुरुष आणि ४३ वर्षे वयाची महिला पॉझिटिव्ह आली आहे. भाई कोतवाल रोडवरील पूर्वी असलेल्या कुटुंबातील एक ७५ वर्षे वयाची महिला बाधीत आली आहे. पटवे गल्लीमध्ये यापूर्वी बाधित असलेल्या कुटुंबातीलच दोन पुरुष ४९ आणि ३९ वर्षे वयाचे पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच शिंदेवाडा परिसरातील यापूर्वी बाधीत असलेल्या कुटुंबातील दोन पुरुष ६८ आणि २२ वर्षे वयाचे रुग्ण बाधित आले आहेत. तसेच सुभाष रोड परिसरातील ४८ वर्षे वयाचा पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पाटील गढी भागातील रेशन दुकानदार ४८ वर्षे वयाचा पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.