भुसावळ शहरातून १५ उपद्रवी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:54 IST2018-09-20T17:52:21+5:302018-09-20T17:54:08+5:30
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील दोघांना २ वर्षांसाठी तर १२ उपद्रवींना ७ दिवसांसाठी हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी दिले.

भुसावळ शहरातून १५ उपद्रवी हद्दपार
भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील दोघांना २ वर्षांसाठी तर १२ उपद्रवींना ७ दिवसांसाठी हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी दिले. बाजारपेठचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांनी प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी, अजय गिरधारी गोडाले, शेख चांद शेख हमीद यांचे हद्दपारीचे प्रस्ताव पाठविले होते. तिघांना २ वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश प्रांत डॉ. चिंचकर यांनी पारित केले. नथ्थू ठाणसिंग राजपूत, अमोल काशिनाथ राणे, जितेंद्र उर्फ मोनू रामदास पोले, अरबाज हैदर मलिक, निखिल सुरेश राजपूत, अक्षय प्रताप न्हावकर, जयेश दत्तात्रय चौधरी, श्रावण रमेश देवरे, हिरामण उर्फ गोजºया सखरू जाधव, शम्मी प्रल्हाद चावरिया, माजी नगरसेवक समीर उर्फ धोनी कृष्णधन कर, रवींद्र उर्फ दादू रमेश चौधरी या १२ जणांना गणेशोत्सव काळात १९ ते २४ सप्टेंबरपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.