निवडणुकीसाठी 15 हजाराची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2017 01:17 PM2017-07-13T13:17:46+5:302017-07-13T13:17:46+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी मेहरुण तलाव परिसरात रंगेहाथ पकडले. दोघांना अटक करण्यात आली आहे

15 thousand bribe for elections | निवडणुकीसाठी 15 हजाराची लाच

निवडणुकीसाठी 15 हजाराची लाच

googlenewsNext
लाईन लोकमतजळगाव, दि. 13 - पिंपळगाव हरेश्वर (ता.पाचोरा) येथील भोईराज मत्स व्यवसायिक संस्थेचा निवडणूक कार्यक्रम लावणे व निवडणूक अधिकारी नेमण्यासाठी पंधरा हजाराची लाच घेताना सहकारी संस्थेचे (दुग्ध) सहायक निबंधक रवी लक्ष्मण गडेकर व लेखा परिक्षक मजीदखॉ कालेखा जमादार या दोन्ही अधिका:यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी मेहरुण तलाव परिसरात रंगेहाथ पकडले. दोघांना अटक करण्यात आली आहे.तक्रार पिंपळगाव हरेश्वर येथील भोईराज मत्स व्यवसायिक संस्थेचे चेअरमन आहेत. या संस्थेची निवडणूक 8 मे 2012 रोजी झाली होती. ही मुदत संपल्याने संस्थेची निवडणूक कधी लावणार याबाबत तक्रारदार गडेकर व जमादार यांना भेटले होते. त्यासाठी या दोघांनी त्यांच्याकडे 15 हजार रुपयांची लाच मागितली होती.

Web Title: 15 thousand bribe for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.