दापोरा येथे 15 हजाराचे गावठी दारूचे रसायन नष्ट
By Admin | Published: June 6, 2017 12:46 PM2017-06-06T12:46:23+5:302017-06-06T12:46:23+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाची आठवडाभरात दुसरी कारवाई
ऑनलाईन लोकमत
दापोरा,दि.6 - दापोरा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून सोमवारी गावठी दारूचे 14 हजार 450 रुपयांचे रसायन नष्ट केले. आठवडाभरात पथकाने दुसरी कारवाई केली आहे.
जळगाव तालुक्यातील दारोपा येथील हातभट्टीची दारू बंद करण्यात यावी अशी मागणी महिला वर्गाकडून होत होती. त्यानुसार याच आठवडय़ात पथकाकडून दुसरी करण्यात आली.
या कारवाईत 600 लिटर दारू निर्मितीचे रसायन नष्ट करण्यात येऊन 14 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या पथकाने यापूर्वी 31 मे रोजी कारवाई केली होती. या कारवाईत 1060 लिटर दारू निर्मितीचे रसायन नष्ट करून 20 लिटर दारू व 38 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला होता. कारवाईत निरीक्षक एस.के.कोल्हे, दुय्यम निरीक्षक आर.के.लब्धे, जवान आर.डी. जंजाळे, जी.डी. अहिरे यांनी सहभाग घेतला.